आटपाडी/सांगली : आटपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. गोपीचंद पडळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी यांच्यावरून चाललेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना छेडले आहे. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळीही सावरकर यांचा अपमान झाला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मनिशंकर आय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी त्यांचा अवमान केल्यावर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जोड्याने मारणार आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मुळामध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सावरकर समजणारच नाहीत.
महाविकास आघाडी किती जरी एकत्र आले तर गावगाड्यातील लोकं त्यांना पसंती देणार नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राहुल गांधी आणि सावरकर या दोन्ही गोष्टींवरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये मनिशंकर आय्यर यांनी त्यांच्याबद्दल गंभीर विधान केले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेला जोड्याने मारेल होते. त्यामुळे आताही राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केल्यावर उद्धव ठाकर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भूमिक घेणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आज उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसला फक्त बोलतात की, त्यांनी सावरकरांच्या बाबतीमध्ये पुन्हा बोलू नये. तरीही वारंवार उद्धव ठाकरे यांनी सांगितले तरी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा अपमान केला जातो आहे हे वास्तव आहे असा टोलाही त्यांनी काँग्रेसबरोबरच उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सध्याच्या राहुल गांधी आणि सावरकर या विषयावरून तरी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव ठाकरे हे कोसो दूर गेलेले आहेत अशी गंभीर टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. याबाबतीत विरोधाची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
त्यामुळे मूळ हिंदुत्व आणि सावरकरांच्या विचारसरणीपासून ते आता दुरावलेले असल्याची टीका भाजपमधून केली जात आहे. ते सांगलीच्या आटपाडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा दरम्यान बोलत होते.
या वर्षाभरामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार स्वातंत्रवीर सावरकरांच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करतात. त्यामुळे सावरकरांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे.
काँग्रेसकडून आणि राहुल गांधी यांच्याकडून सावरकर यांचा सातत्याने अपमान होत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर सावरकर गौरव यात्रेचे नियोजन केलेल असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.