एसटी चालक पतीला सुट्टी देत नसल्याने पत्नीचे अनोखे आंदोलन; प्रशासनाने घेतला धक्कादायक निर्णय

| Updated on: Mar 13, 2023 | 6:35 PM

एसटी चालक विलास कदम यांचे सेवानिवृत्तीसाठी अवघे 70 दिवस शिल्लक आहेत, तर त्यांचे रजेचे 270 दिवस शिल्लक असतानाही त्यांना सुट्टी देण्यात आली नाही.

एसटी चालक पतीला सुट्टी देत नसल्याने पत्नीचे अनोखे आंदोलन; प्रशासनाने घेतला धक्कादायक निर्णय
Follow us on

सांगली : एसटी चालक पतीला सुट्टी देण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या एका महिलेने सांगली जिल्ह्यातील आटपाडी एसटी आगारा विरोधात आंदोलन करण्यात आले होते. चालक पतीला सुट्टी देण्यात यावी यासाठी आगार प्रमुखांच्या केबिनसमोर अंथरून टाकत झोपून महिलेने निषेध नोंदवला. न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर एसटी प्रशासनाने मात्र वेगळाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अजब व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने त्या महिलेवरच प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता आश्चरय् व्यक्त केले जात आहे.

सांगलीच्या आटपाडी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या विलास कदम यांना सुट्टी देण्यात आली नाही. 12 आणि 13 मार्च रोजी त्यांनी आपल्या पत्नीच्या आजाराच्या उपचारासाठी सुट्टी मागितली होती.

मात्र ती नाकारण्यात आल्यानंतर विलास कदम यांना ड्युटीवर हजर राहावे लागले होते. मात्र पत्नीच्या उपचाराचा प्रश्न तसाच राहिला होता. त्यानंतर पती कामाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने एसटी आगारविरोधात आंदोलन करण्यात आले.

एसटी आगार प्रमुखांच्या दालनासमोर एसटी चालक नलिनी कदम यांनी अंथरून पांघरुन ठाकून तेथेच झोपून आंदोलन करत एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवला होता.

एसटी चालक विलास कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट आगार प्रमुखांच्या दालनासमोर अनोख्या पद्धतीचे आंदोलन केल्यानंतर मात्र आटपाडी एसटी प्रशासनाला खडबडून जाग आली.

त्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या कदम यांची भेट घेतली.धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या रजेसाठी आंदोलन करणाऱ्या नलिनी कदम यांच्या विरोधात आटपाडी एसटी आगाराकडून आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वास्तविक एसटी चालक विलास कदम यांचे सेवानिवृत्तीसाठी अवघे 70 दिवस शिल्लक आहेत, तर त्यांचे रजेचे 270 दिवस शिल्लक असतानाही त्यांना सुट्टी देण्यात आली नाही.

तर दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी आजारी आहे. त्यामुळे त्यांना औषध उपचारासाठी घेऊन जाणे त्यांची जबाबदारी आहे. पतीला सुट्टीच मिळत नाही, मग करायचं काय म्हणून थेट एसटी प्रशासना विरोधात त्यांनी आंदोलन केलं होते. पण हे आंदोलन त्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून एसटी प्रशासनाकडून अन्याय करण्यात आल्याची भावना व्यक्त केल जात आहे.