सांगली : सांगलीतील ग्रामस्थ आणि तरुण युवकांनी अजब धाडस केलं आहे. वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथील ग्रामस्थांना खांद्यावरुन चक्क मगर नेली आहे. या ग्रामस्थांनी तब्बल 12 फूट मगर पकडली होती. मात्र अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी हे ग्रामस्थांनी धाडस केलं आहे. (Sangli Villagers Catch Crocodile)
वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आली. पण कोणतेही अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडत वन विभागाकडे सुपूर्द केली.
गेल्या काही दिवसांपासून कृष्णेच्या काठी मोठ्या प्रमाणावर अजस्त्र मगरीचे दर्शन होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेलं होते. सांगली जिल्ह्यातील सटपेवाडी येथे ग्रामस्थांना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तब्बल दहा ते बारा फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले.
ग्रामस्थांनी आणि गावातील युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद केले. त्यानंतर ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरुन मगरील घेऊन जात वन विभागाच्या ताब्यात दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नैसर्गिक आदिवासात सोडून दिले आहे.
दरम्यान कृष्णेच्या काठी पुन्हा मगरींचा वावर वाढला आहे. नागरिकांनी मगरीच्या नैसर्गिक आदिवासापासून दूर राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे. (Sangli Villagers Catch Crocodile)
पहाटे 3 वाजता चढाईला सुरुवात, सकाळी 10 वाजता टोकावर, पोलिसाकडून लिंगाणा किल्ला सर
Delhi Farmers Tractor Rally: शरद पवारांची टीका झोंबली; प्रवीण दरेकर म्हणतात…