मुंबई आणि दिल्ली सारख्या महत्वाच्या विमानतळाच्या सुरक्षेशी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी खेळ चालविण्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. परवा अजित पवार आले आणि त्यांच्या नाट्य कलेची माहिती त्यांनी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री अजितदादांनी आपण राष्ट्रवादी पक्षांची फूट पाडण्यापूर्वी 10-12 वेळा वेष पालटून आल्याचे सांगितले. बनावट नावाने ते आले होते त्यामुळे त्यांचे सगळे बोर्डींग पासेस जप्त करावेत. या महाराष्ट्राला कलाकारांची मोठी परंपरा आहे. अजितदादांनी वेष पालटून बऱ्याच गोष्टी केल्याचं सांगितलं आहे. विमानतळाची सुरक्षा किती खोटी आहे हे यातून दिसून येते. यातून देशात घातपाताला चालना मिळू शकते असेही राऊत यांनी म्हटले आहे. वेष पालटून येऊन एक व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो हा देशाच्या सिक्युरिटी सोबतचा खेळ आहे. दाऊद, टायगर मेमन यांन ही संधी मिळाली होती का ? असा सल्ला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदाराचं बंड आणि पक्षाची पळवापळव याविषयावर याचिकांची सुनावणी एकीकडे सर्वोच्च न्यायालयात अखेरच्या टप्प्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अभिनयाची माहिती सर्वांना देऊन आश्चर्यचकीत केले आहे.मागे शिवसेनेत फूट पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेष पालटून यायचे असं त्यांनी सांगितलं होतं. एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. ते एका मौलवीच्या नावाने दिल्लीत आल्याची आपल्याकडे माहिती असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आमच्यासाठी हा गंभीर मुद्दा आहे. आम्ही आणि राज्याचे काही प्रमुख लोक बसून यावर चर्चा करू असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.
आगामी निवडणूकांत उद्धव ठाकरे यांनी घेरण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आता राहुल गांधी आणि ठाकरे यांच्या इंडिया आघाडीला सावरकरांचा राहुल गांधींनी केलेला अपमान या विषयावर घेण्याची योजना आखल्याच्या बामती प्रसिध्द झालेल्या आहेत. याविषयी विचारता संजय राऊत म्हणाले की सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होते.सावरकर यांनी सन्मान द्यायचा असेल तर आधी त्यांना भारतरत्न द्यावा आणि मग आमच्याकडे या असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे यांनी विधानसभेत 250 जागा लढविण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की सुपारीबजांवर मी बोलत नाही. लोकसभेला वेगळी सुपारी होती, आता विधानसभेला वेगळी सुपारी आहे. अशा सुपाऱ्या ते कमरेला बांधून फिरतात असेही राऊत यावेळी म्हणाले. संसदेत पत्रकार कक्षात जाळी लावली आहे. त्यासंबंधी संजय राऊत म्हणाले की मी स्वतः पत्रकार आहे. मी वार्तांकन केलं आहे. मोदी घाबरले असतील. राहुल गांधी आल्यामुळे संसदेचा माहोल बदलला आहे. तो कमी करण्यासाठी पिंजरा लावला असेल. मागे संसदेत अनेक चित्रपट अभिनेत्री आल्या होत्या, त्यांच्यासोबत फोटो काढले गेले. तेव्हा त्यांनी घोषणा दिल्या होत्या. राहुल गांधी ही या सरकारची सगळ्यात मोठी पिडा आहे. ही पिडा काही दूर होणार नाही असेही राऊत यावेळी म्हणाले.