मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत भाजपवर बरसत आहेत. आज त्यांनी पुन्हा भाजपला केद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून (ED, CBI) इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता संयम संपलेला आहे. मुख्यमंत्री, (Cm Uddhav Thackeray) गृहमंत्री एक्शन मोडमध्ये आले आहेत, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत, राज्यात त्यांनी हैदोस घातलाय. या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहेत. मात्र केस किती खोट्या पायावर उभी आहे, ते तुम्हाला कळेल, असेही राऊत म्हणाले आहेत. तसेच देशमुखांच्या 6 वर्षांच्या नातीची चौकशी करावी, एवढं नीच राजकारण सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले आहेत.
नवाब मलिक यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना, नवाब मलिक 55 लाखांची केस 5 लाखांवर आली. माझ्या बाबतीतही 11 कोटी 1500 कोटी, जुन्या काळातलं कोणतं तरी प्रकरण काढायचं आणि त्रास द्यायचा हे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहेत. तसेच भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले, 13, 14 वर्षांपूर्वी विक्रांतच्या नावाखाली पैसे दिले, त्यांना वाटतं आमचे पैसे योग्य ठिकाणी गेले. मात्र राजभवन आमचं नाही, त्यांचं आहे. त्यांनी पैसे न मिळाल्याची माहिती दिली. तसेच तुम्ही महात्मा गांधी आहात का? दादासाहेब धर्माधिकारी आहात का? विनोबाजी भावे आहात का? तुम्ही भ्रष्ट आहात. लोकांसाठी वेगळ्या कारणावरुच पैसे गोळा केले आणि पक्षाला दिले, पावती कुठंय.. फक्त 11 हजार म्हणत आहेत, मात्र मी म्हणतो 58 कोटी रुपयांचा आरोप माझा बरोबर आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
तसेच संजय राऊतांनी अनेकदा न्यायालयावर आरोप लावल्याचा आरोपही भाजपकडून होत आहे. मात्र या आरोपांना उत्तर देताना, मी वस्तूस्थिती सांगतोय. दिशा सालीयन प्रकरणामध्ये दिलासा. अटकेपासून संरक्षण, विक्रांत प्रकरणात अटकेपासून संरक्षण, मुबै बँकेच्या घोटाळ्यात अटकेपासून संरक्षण, अशी 10-12 उदाहरण देता येईल, ज्यात भाजप नेत्यांना संरक्षण दिलं जातंय. मात्र आम्हाला अटकेपासून संरक्षण नाही, आमच्यावर ताशेरे ओढले जातायत, आमच्या केसेस ऐकून घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
ऊस शेतीवर शरद पवारांनी बोलनं हे अत्यंत दुर्दैवी; राजू शेट्टींचे शरद पवारांना प्रत्युत्तर