नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूका जवळ आल्या की भारत-पाकिस्तानचा मुद्दा सुरू होईल, गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि अचानक चीनने घुसखोरी कशी काय केली ? असा सवाल उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांनी अशी शंका घेऊन भाजपवर टीका करत गंभीर आरोप केले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत गुजरात निवडणूक ते लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. यामध्ये भाजपवर निशाणा साधत पाकव्याप्त काश्मीरच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. काश्मीरी पंडिताची हत्या होत आहे असल्याचे देखील राऊत यांनी म्हंटले आहे. गुजरातच्या निवडणूक झाल्यात आणि अचानक चीनने घुसखोरी कशी केली ? असा सवाल उपस्थित करून संजय राऊत यांनी भाजपच्या राजकरणावर बोट ठेवलं आहे.
लोकसभा निवडणूक आली की भाजपकडून भारत-पाकिस्तानचा मुद्दा काढला जातो, आताही गुजरातच्या निवडणूका झाल्यावर चीनच्या घुसखोरीचा मुद्दा समोर आल्याची टीका राऊत यांनी केली.
याशिवाय नाशिकमधील पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र कर्नस्टाक सीमा प्रश्न गुजरात विमानतळवरच सुटेल असे वाटत होते ? असा टोला लगावत राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या प्रश्नावरून राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमीवर नाराजी व्यक्त करत कर्नाटकचा बंदोबस्त काढून केंद्राची सुरक्षा का उभी केली नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे.
चीन विषयी कोणीही मोठा नेता बोलत नाही. पाकिस्तानचे नाव घेतात, मात्र चीनचे नाव घेत नाही, चीनला घाबरतात, अमित शहा म्हणतात जमीन जाऊ देणार नाही मात्र जमीन याआधीच गेली आहे अशी केंद्र सरकारवर राऊत यांनी टीका केली.