नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नारायण राणे यांनी 26 डिसेंबरच्या अग्रलेखाचा संदर्भ देत संजय राऊतला सोडणार नाही म्हणत पुन्हा जेलमध्ये टाकण्याची भाषा केली होती, त्यावरून संजय राऊत यांनी राणे यांच्यावर हल्लाबोल करत एकेरी भाषा वापरत राणे यांना खुलं आव्हान दिलं होते. यामध्ये राणेंना पन्नासवर्षे जेलमध्ये राहावं लागेल असं म्हणत राऊत यांनी जुनी प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर राणे यांनीही संजय राऊत यांना कुठं भेटायचं म्हणून सांग असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी इथवरच न थांबता तुम्ही गुंड असेल तर मी महागुंड असल्याचे म्हंटले होते. यावरून नारायण राणे यांनीही संजय राऊत यांची तक्रार उद्धव ठाकरे यांना केली तर चपलेने मारेल असं म्हंटलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा हल्लाबोल करत थेट नारायण राणे यांचे भविष्य सांगून टाकलं आहे. नारायण राणे यांच्या मंत्रीपदावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी यापूर्वीही नारायण राणे यांच्या मंत्रीपदावर भाष्य केलं होतं. नारायण राणे हे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खात्याचे मंत्री आहेत.
नारायण राणे यांचं मंत्री पद जातंय असं म्हणत संजय राऊत यांनी थेट नारायण राणे यांच्याबदलची शंका व्यक्त केली आहे.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना त्यांनी हे विधान केले आहे, यावेळी त्यांनी नारायण राणे यांना पक्ष सोडल्यानंतर कधीही भेटलो नाही असा खुलासा केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी नारायण राणे भेटत असेल तर त्याचे निमित्त मी आहे. असेही संजय राऊत यांनी म्हणत यावर उद्धव ठाकरे आणि माझं फोनवर बोलणं झाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.