नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये शिवगर्जना शिवसंकल्प सभा उद्धव ठाकरे घेत आहे. त्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी कोंकण येथे पहिली सभा होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कुठे होणार याबाबत चर्चा सुरू असतांना उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी माध्यमांशी बोलत असतांना उद्धव ठाकरे यांची 26 मार्च ला मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. संजय राऊत यांनी यावेळी बोलत असतांना दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच नाशिक दौरा केला आहे. मालेगाव येथे उत्तर महाराष्ट्राची जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांची दादा भुसे यांच्या मतदार संघात ही जाहीर सभा होणार आहे.
मागील महिन्यात शिवसेना ठाकरे गटात मालेगाव येथील अद्वय हिरे यांनी प्रवेश केला आहे. दादा भुसे यांना क्षह देण्यासाठी हिरे यांचा प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. दादा भुसे हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहे.
खरंतर दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सभेच्या तयारीला लागले आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याने अद्वय हिरे यांना ठाकरे यांच्याकडून बळ दिले जात आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्राची ही सभा होत असतांना मालेगावच्या शेजारी असलेला मतदार संघ हा एकनाथ शिंदे यांच्यात सोबत असलेल्या सुहास कांदे यांचा आहे. सुहास कांदे यांच्यासहित दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या रडारवर असणार आहे.
उद्धव ठाकरे यांची ही सभा राज्यात सत्तांतर झाल्यानंतरची पहिलीच सभा असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा जंगी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संजय राऊत यांनी सूचना दिल्या आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कशी होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.