मुंबई : पक्षासाठी मी मरायला तयार आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यावरून संजय राऊत यांना तब्बल 102 दिवसांनी जामीन मंजूर झाला असून सायंकाळी उशिरा त्यांना कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहाच्या बाहेर येताच संजय राऊत यांचा तोच करारी बाणा पुन्हा एकदा दिसला आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असतांना संजय राऊत यांनी म्हंटलंय की बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणे राहणारे अनेक जण आहेत. त्यापैकी मी एक असून मला त्याचे समर्थन मिळत असून त्यासाठी सन्मान आहे. काही लोक टायगर इज बॅक असं म्हणताय त्यावर तुमचं म्हणणं काय असं विचारताच मी एक शिवसैनिक असून पक्षासाठी मी मरायला तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली होती.
यामध्ये तब्बल 102 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे.
यावेळी माध्यम प्रतिक्रिया काही अंतरावर गेल्यानंतर प्रतिक्रिया देत आहे. यामध्येच माध्यम प्रतिनिधी राऊत यांचे समर्थक टायगर इज बॅक असं बोलत असल्याची सांगितले.
त्यावेळी संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत याचे उत्तर दिले आहे, राऊत म्हणाले मी एक लढणारा शिवसैनिक असून पक्षासाठी मी मरायला तयार आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले मी जेलमध्ये असतांना माझ्या भावाने सर्व जबाबदारी घेतली, माझ्या अनेक आई आहेत मी जेलमध्ये जात असतांना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. आताही आनंदाश्रु असल्याचे राऊत म्हणाले.
ठाकरे गटाची तोफ पुन्हा धडाडणार का ? असं विचारात राऊत यांनी नक्कीच म्हणत पुन्हा एकदा तोच आक्रमकपणा कायम असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर ठाकरेंची तोफ कोण बनणार ? असा सवाल उपस्थित केला जात होता, त्यावर राऊत यांनी स्वतःच सांगून टाकले आहे.
संजय राऊत जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे बंधु त्यांना घेऊन एका देवळात जाणार आहे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाणार असून उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार असल्याची माहिती राऊत यांनी स्वतः दिली आहे.