कोल्हापूर : एकीकडे संजय राऊत ( Shivsena ) यांच्यावर विधीमंडळ चोरमंडळ असल्याच्या विधानावरुण अडचणीत सापडले असतांना दुसरीकडे ते अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत आहे. मात्र अशाच वेळी माझ्यावर केंद्रातही हक्कभंग आणला जाईल असे म्हणत भाजपसह शिवसेनेवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. याशिवाय मला अटक होणार आहे. पण मला त्याची परवा नाही म्हणत संजय राऊत यांनी भाजपसह एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांच्यावर निशाना साधला आहे. मोगॅम्बो कोल्हापुरात येऊन गेले असं म्हणत अमित शहा यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्याच दरम्यान संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असतांना एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतांना वादगस्त विधान केले आहे. त्यावरून संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी विधीमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर केली होती. त्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संजय राऊत यांच्यावर हक्क भंगाची कारवाई व्हावी यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
त्यावरून विधानसभेच्या अध्यक्षांनी 8 मार्च पर्यन्त चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. त्यामध्ये संजय राऊत यांना याबाबतची संपूर्ण कल्पना असल्याने त्यांनी मला अटक होईल अशी शक्यता वर्तवली आहे.
संजय राऊत यांनी मला अटक केली जाईल पण मला त्याची परवा नाही असे म्हणत भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये त्यांनी मला यापूर्वी अटक झाली होती. माझ्या घरावर धाड पडली होती असेही म्हंटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, भाजपकडे गेले की वॉशिंग मशीन आहे. तिकडे गेल्या की चौकश्या, समन्स सगळं बंद होतं असं म्हंटले आहे. त्यामुळे विरोधकांना नोटिसा देऊन, ईडी, सीबीआय लावून अटक केली जात असल्याचा हल्लाबोल केला आहे.
याशिवाय काही दिवसांपूर्वी अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना न्याय मिळाल्याचे म्हंटले होते त्यावरून संजय राऊत यांनी हल्लाबोल करत अमित शहा यांना डिवचलं आहे. संजय राऊत यांनी मोगॅम्बो म्हणत अमित शहा यांच्यावर टीका केली.
आपण केलेली टीका लक्षात येताच संजय राऊत यांनी अमित शहा माझ्यावर तिकडे हक्कभंग आणू शकतात असं म्हंटलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी हल्लाबोल करत असतांना आपली चुक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.