मुंबई : शिंदे गॅंगमधील मंत्री मला धमकी देत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे याकडे लक्ष देतील असा मला विश्वास आहे. केसरकर तुमच्या इशाऱ्यावर कायदा चालतो का? मिस्टर केसरकार मला अटक करा, मला गोळ्या घाला असे म्हणत संजय राऊत यांनी मी पुन्हा सांगतोय, मै झुकेगा नहीं साला असे ट्विट करत संजय राऊत यांनी केले आहे. दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना पुन्हा जेलमध्ये जायची हौस आहे का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार करत दीपक केसर हे काही कायदा नाही, कोर्ट नाही. केसरकर यांचं सगळं रेडी आहे त्यांनी 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी करावी असा पलटवार संजय राऊत यांनी केला होता. यावरून दीपक केसरकर यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून ट्विट केल्यानं केसरकर आणि राऊत यांची आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतांना दीपक केसर यांनी संजय राऊत यांना थेट जेलमध्ये जाण्याची हौस आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.
दीपक केसरकर यांनी यावेळी संजय राऊत यांना सल्ला दिला होता, जर तुमच्या विरोधात कुणी कोर्टात तक्रार केली तर जामीन रद्द होऊ शकतो त्यामुळे त्यांनी दहशतवादाची भाषा करू नये असे केसरकर म्हणाले होते.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना संजय राऊत यांनी एक ट्विट करत अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून एकप्रकारे तक्रार केली आहे.
यामध्ये संजय राऊत म्हणाले शिंदे गॅंगमधील मंत्री मला धमकी देत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे याकडे लक्ष देतील असा मला विश्वास आहे.
केसरकर तुमच्या इशाऱ्यावर कायदा चालतो का? मिस्टर केसरकार मला अटक करा, मला गोळ्या घाला असे म्हणत संजय राऊत यांनी मी पुन्हा सांगतोय, मै झुकेगा नहीं साला असं ट्विट राऊत यांनी केले आहे.