नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदारांवर मेरा बाप चोर है! ह्या डायलॉगचा संदर्भ देत निशाणा साधला होता. यामध्ये जे आमदार सोडून गेले त्यांना त्यांची मुलं, नातेवाईक गद्दार आहे, असं म्हणतील. यांनी स्वतःची राजकीय कबर खोदली आहे. ते प्यारे झाले अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यावरच शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देतांना जीभ घसरली होती. एकेरी भाषा वापरत शिवीगाळ करत गायकवाड यांनी जोरदार टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्हाला शिव्या देतात, यापेक्षा अजून चांगल्या देता येतात. त्यामुळे तुम्ही शिव्या द्या पण ज्यांनी शिवरायांचा अपमान केला त्यांना द्या. आई-बहिणीवरुन शिव्या द्या त्यांना महाराष्ट्र तुमचं कौतुक करत असं म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती, त्यावेळी मेरा बाप चोर है! हा चित्रपटातील संवादाचा दाखला देत गद्दारीचा शिक्का मारल्याचे म्हंटले होते.
त्यावरून संजय गायकवाड यांनी बोलत असतांना राऊत यांना शिवीगाळ केली होती, त्यावर राऊत यांनी गायकवाड यांना उत्तर देतांना शिव्या द्या महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल असं म्हंटलं होतं.
संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर बोलत असतांना मातोश्रीचा संदर्भ देत तुम्हीच कसे गद्दार आहात, पक्ष कसा भुईसपाट केला असं म्हणत टीका केली होती.
एकूणच संजय राऊत आणि संजय गायकवाड यांच्यातील टीका शिवीगाळ पर्यन्त येऊन ठेपली आहे, मात्र यामध्ये राऊत यांनी गायकवाड यांना दिलेलं चॅलेंज गायकवाड स्वीकारतात का ? हे बघणं महटवहाचे ठरणार आहे.