मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कन्नड रक्षण वेदिकेने हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यावर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. कर्नाटक सरकारवर हल्लाबोल करत असतांना संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधत षण्ड असल्याचे म्हटले होते. यावेळी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधत थेट पत्रकार परिषदा बंद पाडू असा इशारा दिला होता. त्यांनंतर राऊत यांना धमक्या येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर राऊत म्हणाले, मी कुणाकडे बोलायला जात नाही, तुम्ही माझ्याकडे येतात मी त्याचे स्वागत करतो. पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणताय ही भाषा कर्नाटक लोकांची भाजप नेते बोलत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. षण्ड ह्या शब्दाचा अर्थ शब्द कोशात बघून घ्या, ज्याला काहीही जमत नाही त्याला म्हणतात, असं संजय राऊत यांनी ठणकावले आहे.
भाजप नेते शिवाजी महाराजांचा अपमान होत असतांना तुम्ही शांत बसलेला आहात हे पाहून मी बोललो असल्याचा दावाही राऊत यांनी केला.
कन्नड वेदिका धमक्या देत आहेत, त्यांनी माझ्यावर हल्ला करू असं म्हंटले आहे आणि तुम्ही शांत बसला आहेत असे राऊत यांनी म्हंटले आहे.
बेळगावमध्ये माझ्यावर हल्ला झाला तर तो माझा नाही माझा नसून महाराष्ट्रावर हल्ला असेल असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
यावेळी कन्नड रक्षण वेदिकेवर हल्लाबोल करत असतांना राऊत यांनी भाजप नेते जे बोलताय ती कन्नडीची भाषा असल्याचा आरोप केला आहे.
एकूणच कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद अधिकच चिघळला आहे. केंद्रातील सभागृहातही याचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे.
सुप्रिया सुळे, विनायक राऊत, अरविंद सावंत हे देखील भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका करत असून संजय राऊत यांना आलेल्या धमकीचा मुद्दा सभागृहात मांडण्याची शक्यता आहे.