दिनेश दुखंडे, मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अत्यंत खळबळजनक ट्विट केलंय. 5 मार्च रोजी झालेल्या एका हल्ल्याचा उल्लेख राऊत यांनी या ट्विटमध्ये केलाय.एका गरीब मुलीवरचा हा हल्ला भाजप पुरस्कृत गुंडांनी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. गरीबांच्या मुली अशाप्रकारे रस्त्यावर पडल्या आहेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलाय. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनाच राऊत यांनी सवाल विचारलाय. ही घटना ५ मार्च रोजीची असून आरोपी अजूनही मोकाट आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच एक धक्कादायक ट्विट शेअर केलंय. यात एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसतेय. तिचे कपडे रक्ताने माखलेले दिसतायत. तर आजूबाजूलाही रक्ताचे डाग दिसतायत. राऊत यांनी ट्विट केलंय…
देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे..
मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला … आरोपी मोकाट आहेत.
देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे..
मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? ५ मार्चला हल्ला झाला
आरोपी मोकाट आहेत.@Dev_Fadnavis pic.twitter.com/E5Bef1sDPb— Sanjay Raut (@rautsanjay61) March 18, 2023
सोलापूर जिल्ल्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ही घटना आहे. एका अल्पवयीन मुलीवर आगोदर बलात्कार आणि नंतर तिच्या कुटुंबियावर आरोपींनी हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. अद्यापही मुलीवर उपचार सुरु असून आता या घटनेचे पडसाद विधान परिषदेमध्ये उमटले आहेत. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण तर वाढत आहेच पण आरोपींना मोकाट सोडल्याने पिडीत मुलीच्या कुटुंबियारही हल्ला झाल्याचं म्हटलं जातंय. संजय राऊत यांनी याच घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलाय.