गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके मारतील – संजय राऊत

| Updated on: Jun 24, 2024 | 11:02 AM

संसदेत आता नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा आवाज चालणार नाही तर इंडियाच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला.

गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके मारतील - संजय राऊत
Follow us on

लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्र आवाज उठवू, आता (आमचा) आवाज घुमणार. संसदेत आता नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा आवाज चालणार नाही तर इंडियाच्या 240 खासदारांचा आवाज घुमणार असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संजय राऊत यांना लगावला होता. काही लोकांना बांबूही लावला पाहिजे. काही लोक असे आहेत की सकाळीच भोंगा वाजतो, एक भोंगा निघाला तर दुसरा चालू झाला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी राऊत यांचे नाव न घेता लगावला.

आज माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. त्यांना टीका करू द्या, सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे, तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या बोकांडी मोदी आणि शाहांनी बसवलं आहे.

खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा ( शिंदे-भाजप) बांबू लागलेला आहे. त्यांच्या महायुतीला आम्ही सर्वांनी मिळून जो बांबू घातला आहे, तो अजून निघालेला नाही. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

या गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके मारतील

आणि येत्या विधासभेच्या निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या. आणि याच बांबूचे फटके सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. त्यांनाआता बांबूची आठवण झाली आहे. लोकसभेला लागलेला बांबू कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की कसा हा प्रश्न त्यांना पडला आहे. की मोदी-शाहाच त्यांना बांबू घालतात, या बांबूवर आता ते अभ्यास करतील, त्यावर त्यांना एखादी बोगस डिग्री मिळू शकते, अशा शब्दांत राऊत यांनी घणाघाती हल्ला चढवला.

पुण्यातील ड्रग्स प्रकरणावरही राऊत यांनी भाष्य केलं. त्याच ड्रग्सच्या  पैशांतून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत. आम्ही वारंवार फक्त आरोप नाही केले तर त्याचे पुरावेही दिले आहेत. यांना पाठिंबा देणारे, पाठबळ देणारे पोलिस, प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे सर्व समोर आलेलं आहे अशी टीका राऊत यांनी केली.