मुंबई : नील सोमय्या यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. कारण नील सोमय्या (Neel Somaiyya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. जम्बो कोविड सेंटरची कंत्राट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नजीकच्या व्यक्तींना देण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. यानंतर संजय राऊत यांनी बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असं म्हटलं होतं. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
संजय राऊतांचे आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या याचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश दीपक भागवत यांच्या समोर ही सुनावणी पूर्ण झाली. त्यांनी जामीन फेटाळत नील सोमय्या यांना पहिला दणका दिला आहे. त्यामुळे आता नील सोमय्यांना अटक होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावेळी किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांचा मुद्दा पुढं आणला होता. नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
सोमय्यांची अटक अटळ?
‘निकॉन इन्फ्रा’ च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या असा संघर्ष सुरू आहे. रोज नव्या आरोपांच्या फैरी सुरू आहेत. अशात नेते एकमेकांना जेलमध्ये जाण्याचे रोज इशारे देत आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना ईडीकडून झालेल्या अटकेनेही राजकारण तापलं आहे. त्यातच आता नील सोमय्यांचा मुद्दा पुढे आल्याने आणकी पॉलिटिकल राडा होण्याची शक्यता आहे.
Video : खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग! ‘जलमंदिर’ परिसरात मारला फेरफटका
लवासाप्रकरणी आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पट करावी, आशिष शेलार यांचं आवाहन