मुंबई : तब्बल साडे नऊ तासानंतर ईडीने शिवसेने नेते संजय राऊतांना ताब्यात घेतले(Sanjay Raut In ED Custody). ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊत बाहेर पडले यावेळी त्यांनी भगवा फडकवला. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालायात नेले. या सर्व कारवाईवर संजय राऊत यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली. ही कारवाई सूडनाट्यातून झाली असून शिवसेनेसाठी बलिदान देण्यास मी तयार आहे. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा असे म्हणत संजय राऊतांनी कारवाईचा निषेध केला. संजय राऊत यांनी tv9मराठीला फोनरुन प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी ट्विट करतही आपली भूमिका मांडली.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार आहे. आम्ही लढत राहू. महाराष्ट्र इतका कमजोर नाहीये आणि शिवसेना इतकी कमजोर नाही. विरोधकांना दाखवून देऊ शिवसेना काय आहे. हा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधला.
तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना त्यांच्या भांडुप येथील राहत्या घरातून ईडीने (ED) ताब्यात घेतले. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतावंर कारवाई झालेय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या पाठिशी असल्याचे संजय राऊतांनी घराहेबर पडल्यावर सांगीतले. मरेन पण झुकणार नाही असंही राऊत म्हणालेआहे. पत्राचाळ प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. भगवे उपरणे घालून राऊत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर घरातून बाहेर पडले. अत्यंत आत्मविश्वासानं ते शिवसैनिकांना सामोरे गेले.
ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून, नेत्यांना पक्ष बदलण्यास किंवा शरणागती पत्करायला भाग पाडले जाते. या अटकेतून त्यांना नवी प्रेरणा मिळेल, असे राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेनेसाठी बलिदान देण्याची तयारी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी tv9ला फोनरुन प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी हे स्पष्ट केले आहे.