काल नागपंचमी होती, गद्दार सापांचे फणे ठेचण्यासाठी कालच आलो असतो… संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2024 | 9:47 PM

विधानसभा निवडणूकांची घोषणा जरी झाली नसली तरी वातावरण तापले आहे. बीड येथे राज ठाकरे यांच्या कारवर सुपारी टाकण्यात आल्या तर आज ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या कारवर नारळ टाकण्यात आले.

काल नागपंचमी होती, गद्दार सापांचे फणे ठेचण्यासाठी कालच आलो असतो... संजय राऊत यांचा हल्लाबोल
Follow us on

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या  शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याच्या आधी गडकरी रंगायतन येथे मनसे सैनिकांना नारळ, बांगड्या आणि टोमॅटो फेकूुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की ज्या ठाण्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पहिला विजय मिळवून दिला. त्या शिवसेनेचे हे ठाणे आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरु आहे. काल नागपंचमी होती असा उल्लेख करीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टिका केली आहे.

संजय राऊत यांनी आपल्या भाषणाची सुरुवात दणक्यात केली. आता घोषणा सुरु होत्या. राऊत साहेब तुम आगे बडो.  शिवसेना ही चार अक्षरं ज्याच्या पाठी आहे, तो नेहमीच आगे असतो. आम्हाला तर बाळासाहेबांचे आशीर्वाद लाभले आहेत असेही संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की ज्या ठाण्याने हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं ठाणं आहे. त्या ठाण्याने उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने काम सुरू आहे. हा भगवा सप्ताह काल ठाण्यात व्हायला पाहिजे होता असे सांगत संजय राऊत पुढे म्हणाले की  काल नागपंचमी होते. ज्या सापांना या ठाण्यात इतकी वर्ष दूध पाजलं अगदी हिंदुहृदय सम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे तुम्ही या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नाही असा यल्गारच संजय राऊत यांनी केला.

मी सिनेमा काढणार नाव त्याचं, नमक हराम – 2 .

आपला भगवा सप्ताह आहे. त्यांचा आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींना म्हणतात आम्हाला जगवा. सध्या ते सिनेमे फार काढीत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की दिग्दर्शक हे कळत नाही. मलाही एक सिनेमा काढायाचा आहे. नमक हराम – 2 . माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. एक नमक हराम आला होता. अमिताभ आणि राजेश खन्नाचा. मी चांगला लेखक आहे, हे तुम्हाला माहीती आहे. मी राजकारण घडवतो. बाळासाहेबांनी शिकवलं राजकारण घडवलं पाहिजे, बिघडवलं पाहिजे. तेव्हा मी नमक हराम सिनेमा काढणार आहे. आणि या नमक हरामांची पोलखोल करणार आहे. इथल्या गद्दारांनी ठाण्याचं नाव मातीत मिळवलं. या ठाण्यात अनेक महान लोकं होऊन गेली.