मुंबई : संजय राऊतला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे, स्वतःच घरं सांभाळ ना ? अकलेचे तारे कशाला तोडायला लागला ? हाच माणूस राज्यसभेच्या वेळेला आमच्या पाया पडत होता. आम्ही मतदान केलेलं, म्हणून निवडून येतो, दरवेळेला मतदान करतो आणि हा आम्हाला सांगणार काय ? हा काय आमच्या मतदार संघात येतो का ? याच्या जिवावर थोडीच आमची निवडणूक चालते असे विविध सवाल उपस्थित करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर नेहमीच जहरी टीका केली आहे.
दरम्यान, संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी शिंदे गटाने राजकीय कबर खोदली आहे. ते प्यारे झाले म्हणत सडकून टीका केली होती.
शिवसेना नावावर निवडून येतात, आता शिवसेनेचे नाव न घेता निवडून येऊन दाखवा असंही संजय राऊत यांनी आव्हान केले होते.
मी खात्रीने सांगतो, माझा शब्द आहे. ज्या भागातील जे खासदार आणि आमदार निवडून गेले त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. खासदार गोडसे यांचं तर राजकीय करीयरच संपलं आहे.
आम्हीच ती जागा लढवली होती. जे आमदार गेले. नांदगावपासून मालेगावपर्यंत त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं ना. हा आत्मविश्वास कुठून येतो. आम्ही फिरतो. लोकांमध्ये बसतो. त्यातून त्यांची चीड दिसत आहे. त्यावरून आत्मविश्वास येतो.
सर्व जागेवर आहे. काही पालापाचोळा उडून गेला असेल. तो उडतच असतो. आज या गटात उद्या त्या गटात. हे काही नवीन नाहीये. शिवसेना आहे तशीच आहे असं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये म्हंटलं होतं.
त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठी यांनी जोरदार हल्लाबोल करत स्वतःच आमच्या जिवावर निवडून येतो आणि तो काय सांगणार असं मनात शिरसाठ यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.