मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेल्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; गाडीचं मोठं नुकसान, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 07, 2025 | 6:40 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी निघालेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला आहे, सर्वजण सुखरूप आहेत.

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेल्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; गाडीचं मोठं नुकसान, नेमकं काय घडलं?
Follow us on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान आज संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, ते सकाळीच मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत, आज संतोष देशमुख यांचं कुटुंब फडणवीस यांची भेट घेणार आहे, मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आज मुंबईच्या दिशेन रवाना झालं आहे. अटल सेतू मार्गे मुंबईच्या दिशेन येत असातना, अटल सेतूवरील टोल नाक्यावर हा अपघात झाला. टोलमधून बाहेर पडताना वाहन अडवण्यासाठी जे बॅरिअर बसवलेलं असतं त्या बॅरिअरला देशमुख यांच्या कुटुंबीयांची गाडी धडकली, सुदैवानं मोठा अपघात झाला नाही, सर्वजण सुखरूप आहेत. मात्र या घटनेत वाहनाचं मोठं नुकसानं झालं आहे, गाडीची समोरची काच पूर्णपणे डॅमेज झाली आहे.

संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना फाशीची मागणी होत आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं होतं, आपण या प्रकरणात लक्ष घालू असं अश्वासन राज्यपालांनी यावेळी नेत्यांना दिलं.