औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गेवराई पायगा गावात सरपंच-उपसरपंचाच्या खुर्च्या पेटवल्याची (Sarpanch-Upsarpanch Chair Burned) धक्कादायक घटना घडली आहे. गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने खुर्च्या पेटवल्याची माहिती आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या खुर्च्या पेटवल्या आहेत (Sarpanch-Upsarpanch Chair Burned).
यामध्ये सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकाच्या खुर्च्या पेटवण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतमधून खुर्च्या बाहेर काढून पेट्रोल टाकून खुर्च्या पेटवल्या आहेत. प्रहारचा कार्यकर्ता मंगेश साबळे यांनी हे कृत्य केलं आहे.
पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पदाधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. इतकंच नाही तर फेसबुक लाईव्ह करत खुर्च्या पेटवल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेत सरपंच उपसरपंच ग्रामसेवकाच्या खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील गावकऱ्यांना गेल्या आठ दिवसापासून पिण्याचे पाणी मिळालेलं नाही. वारंवार मागणी केल्यानंतरही ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आदि पदाधिकारी पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या खुर्च्या जाळण्यात आल्या.
गेवराई तालुका फुलंब्री येथे नागरिकांना गेल्या आठ दिवसापासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या आठ दिवसापासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले. वारंवार विनंती केल्यानंतरही पाणी पुरवठा झाला नाही. म्हणून संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच याच्यां खुर्चा जाळल्या.
यानंतरही 24 तासात पाणीपुरवठा न केल्यास सरपंच आणि ग्रामसेवक यांना गाव बंदी करण्यात येईल, असा इशारा इशारा प्रहार युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे यांनी दिला आहे (Sarpanch-Upsarpanch Chair Burned)
Sarpanch-Upsarpanch Chair Burned
संबंधित बातम्या :
ग्रामपंचायतीचा धुरळा: नांदेडच्या तामसामध्ये महाविकासआघाडी पॅटर्न, काँग्रेस शिवेसना नेत्यांची युती
ग्रामपंचायत धुरळा : अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेससमोर शिवसेनेचं आव्हान