सातारा: महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन काळात राज्यभरात विविध जिल्हयांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग दर सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. साताऱ्याचा सध्याचा कोरोनाचा संसर्गदर हा तब्बल 32.7 इतका आहे. (Satara district has top in corona positivity rate in Maharashtra in Second wave of Corona)
सातारा जिल्ह्यातील गेल्या चार दिवसांमधील कोरोना स्थितीचा आढावा
अ.क्र. | दिनांक | पॉझिटिव्ह रुग्ण वाढ | मृत्यू | कोरोनामुक्त |
---|---|---|---|---|
1 | 16 मे | 1778 | 43 | 924 |
2 | 17 मे | 880 | 38 | 1416 |
3 | 18 मे | 1310 | 30 | 3314 |
4 | 19 मे | 2692 | आकडेवारी उपलब्ध व्हायची आहे | आकडेवारी उपलब्ध व्हायची आहे |
सातारा जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने 4 मे ते 10 मे असा लॉकडाऊन सुरु केला आहे. मात्र, बाधित रुग्ण संख्या कमी होत नसल्यामुळे पुन्हा हा लॉकडाऊन 30 मे पर्यन्त वाढवला आहे. लॉकडाऊन सुरु होऊन 15 दिवस झाले आहेत. सातारा जिल्हयात लॉकडाऊन सुरु करण्यापुर्वी 2200 ते 2500 या दरम्यान कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. 3 मे रोजी 2502 कोरोना बाधित सापडले होते. मात्र, 15 दिवसाच्या कडक लॉकडाऊन कालावधीनंतर 1500 ते 1800 बाधित रुग्ण सापडत आहेत. मागील (48 तासात) 19 मे रोजी 2692 रुग्ण सापडले आहेत. यामधून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा जिल्हयात सध्या 22099 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. सातारा जिल्हयाची लोकसंख्या 31 लाख इतकी आहे. मे महिन्याचा मृत्यु दर 2 टक्के इतका आहे. तर पॉझिटीव्हीटी दर 32.7 इतका असून तो राज्यात सर्वाधिक आहे.
मृत्युदर वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे रुग्णालयात न जाता घरातच घरगुती उपचार करणे. यानंतर तब्बेत खालावली की उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे. गृहविलगीकरणादरम्यान घरात कोरोना नियमांचे पालन न करणे. यामुळे पूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरता फिरणे. लॉकडाऊन सुरु करण्याआधी लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम ,भाजी मंडई या ठिकाणी झालेल्या गर्दी मुळे बाधित रुग्ण संख्या वाढली आहे.
सातारा जिल्ह्यामधील लसीकरण
सातारा जिल्हयात सध्या पहिल्या डोसचे लसीकरण 27 टक्के झाले आहे. तर, दुसऱ्या डोसचे 5 टक्के लसीकरण झाले आहे. एकूण आता पर्यंत जिल्हयात 6 लाख 85 हजार 323 लसीकरण झाले आहे
कोरोनामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर https://t.co/5lgSMi5I9k #Exam #Education #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
संबंधित बातम्या:
‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; 85 इंजेक्शन जप्त, 9 जणांना अटक
(Satara district has top in corona positivity rate in Maharashtra in Second wave of Corona)