सातारा : सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात (Mirgaon Satara) दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे, गुरुवारी रात्री अकरा वाजता दरड कोसळली होती, त्यामुळे घरे जमीनदोस्त झाली, काल गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असता तरी ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना मीरगावात जेसीबी सारखे मशनरी किंवा अन्य कोणतीच आली नसल्यामुळे काढण्यात यश आले नाही. शिवाय वर जोरदार पाऊस सुरू होता , आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांचे मृतदेह काढले आहेत , उर्वरित सात जणांचे मृतदेह काढले जात आहेत.
काल दिवसभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी जेसीबी गावात पोहोचू शकली नाही. मीरगावात मोटारसायकल पोहोचणे सुद्धा मुश्किल आहे. तब्बल 40 तासांनंतर गावात दुपारी 3 वाजता जेसीबी दाखल. त्याच्याआधी स्थानिक नागरिक करत होते. मृतदेह शोधण्यासाठी भरपावसात शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
जमीनदोस्त झालेल्या घरात मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. काल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना पावसामुळे काढता आले नाही. गुरुवारी रात्री 11 वाजता कोसळली होती दरड. दुसऱ्या दिवशी प्रशासनाला कळले. मीरगावात लोक रात्री जीवांच्या आकांताने ओरडत होते. दरड कोसळताना काही जण पळून गेले आणि जी लोक राहिली ती दबली गेली.
काल प्रशासनाने प्रयत्न केले मात्र पावसामुळे बचावकार्य सुरुच झालं नाही. या गावात जेसीबी सारख्या यंत्रणा येणे अशक्य आहे. गावातील 200 लोकांना वनविभाग आणि स्थानिकांनी उशिरा सुरक्षितस्थळी हलविले.
मीरगाव कोयना धरण क्षेत्रातील गाव आहे. मीरगावासह अन्य गावांचा संपर्क तुटला आहे. अडीच किलोमीटर कोयनेच्या बॅक वॉटर आणि त्यानंतर दीड किलोमीटर डोंगरावर चढून मीरगावात टीव्ही9 मराठीची टीम दाखल झाली. या गावात मोबाईल बंद आहेत,वीज कनेक्शन चार दिवसांपासून बंद आहे.
कोयनानगर परिसरातल्या ज्या दरडाच्या पायथ्याशी गेल्या कित्येक वर्षापासून सुखाने संसार करणाऱ्या लोकांचे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे, दरड घरावर कोसळल्यामुळे जमीन घरे जमीनदोस्त झाली आहेत, लोकांनी गाव सोडून स्थलांतरित केलय, तर संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर पडली आहेत, ज्या दरडाच्या पायथ्याशी आम्ही खेळलो बागडलो तू दरड आमचा काळ म्हणून येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवंताबाई बाकाडे आणि देवजी बाकाडे यांचे पुत्रांनी व्यक्त केली आहे.
VIDEO : साताऱ्यात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू