सातारा : ग्रामीण भागात एसटीच्या (Satara ST News) कर्मचाऱ्यांचा मनमर्जीपणा, बेफिकीरपणा, त्याचबरोबर लोकांची उद्धटपणे वागणे असं पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यांचे व्हिडीओ (ST Video) सुध्दा अधिक व्हायरल झाले आहेत. राज्य सरकारकड़ून (MSRTC News In Marathi) एसटीच्या जुन्या गाड्या बदलाव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी करीत आहेत. परंतु एसटीच्या बस काही बदलत नाहीत. काल सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्याचा पुन्हा एका आडमुठेपणा उजेडात आला आहे. विशेष म्हणजे ती एसटी तिथं असलेल्या विद्यार्थ्यांनी थांबवली, नाहीतर मोठा अपघात झाला असता अशी तिथल्या प्रवाशांमध्ये चर्चा आहे.
सातारा नागठाणे येथे सातारा ते मुरुड जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिला प्रवासी व महिला वाहकांमध्ये वाद झाला. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागठाणे येथे बस थांब्यावर एसटी बस थांबली. त्यावेळी हा वाद सुरू होता. त्याचवेळी एसटीच्या प्रतिक्षेत अनेक विद्यार्थी रस्त्याच्याकडेला उभे होते. मात्र सुमारे पंधरा मिनिटे झाल्यानंतर सुध्दा एसटीचा दरवाजा आतून उघडला गेला नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
या दरम्यानच एका विद्यार्थिनीने चक्क खिडकीतून एसटीमध्ये प्रवेश केला. हे थरारक चित्र पाहून एसटीच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी खिडकीतून आतमध्ये घुसत असताना एसटी पुढे जात होती, त्यावेळी विद्यार्थ्यांनी ती बस थांबवली. त्यावेळी हा प्रकार पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. एसटी थांबल्यानंतर पुन्हा एसटी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. काल एसटीच्या कर्मचाऱ्याने डोक्यावर छत्री पकडून गाडी चालवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.