महाराष्ट्रमधील साताऱ्यामध्ये धक्कादायक घटना घडलीये. एका तरूणीने सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घातल्याची घटना घडलीये. सेल्फी घेत असतानाच तरूणीचा तोल गेल्याने चक्क एक तरूणी 60 फूट दरीमध्ये कोसळली. त्यानंतर नशीबाने ती वाचली. तरूणीचा वाचवताचा व्हिडीओ समोर आला आहे.
या तरूणीचे नाव नसरीन आमिर कुरेशी असून ती पुणे येथील रहिवाशी आहे. नसरीन कुरेशी ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आली होती. यावेळी बोराने घाट येथे थांबून सर्वजण सेल्फी घेत होते. यावेळी सेल्फी घेताना नसरीन हिचा तोल गेला आणि ती दरीमध्ये पडली. यानंतर तिच्या मित्रांनी यासंदर्भातील माहिती स्थानिक लोकांना आणि पोलिसांना दिली. त्या तरूणीचे सुदैव इतके चांगले की, तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. मात्र, या तरूणीच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पाहा व्हिडीओ:-
सातारमध्ये ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेलेली पुण्यातील तरूणी सेल्फी घेताना दरीत पडली होती, सुदैवाने ती वाचली तिला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ समोर आलाय #satara #thoseghar #viral #म pic.twitter.com/9NANV7LQoE
— Harish Malusare (@harish_malusare) August 6, 2024
तरूणीला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतर तिला वाचवण्यात अखेर यश आले. गेल्या काही दिवसांपासून सतत सेल्फी घेताना पाय घसरून किंवा तोल जाऊन दरीमध्ये पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीये. रायगडमध्येही अशाप्रकारची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यावेळी आनवी कामदार हिचे निधन झाले होते.
सातत्याने सेल्फी घेताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते. मात्र, पर्यटक उत्साहाच्या भरात अशा ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत धोकादायक आहे. धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेऊ नका, असेही आवाहन प्रशासनाकडून सातत्याने पर्यटनस्थळी केले जातंय. मात्र, त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.