सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांची खेडेगावात शेती आहे. शिवाय गोपालनाचा व्यवसायही आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग ते करतात. पण, त्यांच्या गावाजवळ जंगल आहे. या जंगलात वन्यप्राणी आहेत. हे वन्यप्राणी शेतीचे नुकसान करतात. यामुळे या भागातील शेतकरी परेशान होते. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलासादायक प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी स्वतः केले. सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून सह्याद्रीच्या पर्वत रांगा ओळखल्या जातात. मुख्यमंत्र्याच्या गावापासून 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर हा परिसर आहे. या परिसरात अकल्पे, उचाट, निवळी, लामज, वाघवळे अशा असंख्य भागातील ग्रामस्थांना रोजगाराचा प्रश्न होता.
आजपर्यंत कोणतंच साधन नसल्यामुळे या भागातील लोक खिचपत पडलेली आहेत. या भागामध्ये लोकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवडीचा पर्याय या लोकांसमोर ठेवला आहे.
बांबू लागवडीतून शासनाकडून त्याच्या देखभालीसाठी पैसे मिळणार आहेतच. शिवाय तीन वर्षानंतर या बांबूमधून त्या कुटुंबाला घरखर्चाला लागतील, एवढे पैसे उपलब्ध होऊ शकणार आहेत. या भागातल्या लोकांकडे शेती आहे. मात्र या भागामध्ये जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागतो.
या अशा भागात आता मुख्यमंत्र्यांकडून बांबू लागवडीचा एक वेगळा प्रकल्प तयार केला जातोय. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपचे आमदार पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, सातारा जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते. शेकडो बांबूची लागवड यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यावेळी पार पडला.
सर्वसाधारण जागेत बांबूचे उत्पादन होते. बांबूला जनावर खात नाहीत. किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान करू शकत नाही. त्यामुळे बांबू पिकातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.