सातारा : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील रेणूका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) एक अजब घटना घडली आहे. येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. अचानकपणे पेट घेतल्यामुळे काय करावे हे येथील लोकांना समजले नाही. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या इतर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान त्या ठिकाणी असणारे कर्मचारी जावेद शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फायर फायटरचा सिलिंडर ( Fire Extinguisher) फोडून तत्काळ आग विझविली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जावेद शेख याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. साताऱ्यात पेट्रोल पंपावर ही घटना अचानकपणे घडली. यावेळी सिलिंडर फोडून आग विझवण्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. चक्क पेट्रोल पंपाने पेट घेतला असता. मात्र जावेद शेख यांनी हजरजबाबीपणा दाखवल्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.
या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्य महिलेच्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, अशा घटना घडू नये म्हणून प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आगीची घटना घडलीच तर वेळीच आग विझवण्यासाठी आग विझवणाऱ्या सिलिंडरचा वापर करावा असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
Kolhapur | विक्रीस आणलेल्या 8 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक, लाखोंचे नुकसान
OBC Reservation | ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी का केली नाही सही, भुजबळ म्हणतात…!