सातारा : शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यातील पाटण तालुक्यातील रोमनवाडी गावात घडली आहे. सौरभ अनिल पवार (16) व पायल अनिल पवार (14)अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. भाऊ-बहिणीच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पाटण पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत सौरभ आणि पायल ही मुले मूळी पाटण तालुक्यातील काठी गावातील रहिवासी आहेत. सौरभ आणि पायल आपल्या आई वडिलांसोबत रोमनवाडी येथील सचिन जाधव यांच्याकडे पाहुणे आले होते. यावेळी ही दोन्ही मुले सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्याकडे फिरायला गेली होती. शेततळ्याजवळून जात असताना सौरभ पवार याचा पाय घसरला आणि तो तळ्यात पडला. भावाला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी पायलने पाण्यात उडी मारली आणि दोघेही बुडाले. ही बाब सचिन जाधव आणि मुलांच्या आई वडिलांना कळताच त्यांनी तात्काळ शेततळ्याकडे धाव घेतली. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. या घटनेची माहिती पाटण पोलिसांना देण्यात आली. मयत सौरभ हा रेठरे येथे आयटीआय शिकत होता. तर मुलगी पायल विजयनगर येथे इयत्ता आठवीत शिकत होती.
गेल्या आठवड्यात नांदेडमध्येही अशाच प्रकारची घडली होती. शेततळ्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाला होता. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील बन चिंचोली गावात 12 जानेवारी रोजी शेततळ्यात पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. संजय कवाने(18) आणि दत्ता जटाळे(20) अशी मयत युवकांची नावे आहेत. यातील दत्ता हा मासे पकडण्यासाठी शेततळ्यात उतरला असता तो बुडत होता. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी संजयने पाण्यात उडी घेतली. या घटनेत दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने बन चिंचोली गावांवर शोककळा पसरली. (Brother and sister drowned in a pond in Patan taluka of Satara)
इतर बातम्या
Pen Crime : पेणमध्ये स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले, 56 लाखाची रक्कम लंपास