सातारा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो नागरिक उपस्थित होते. त्यावेळी उष्माघाताने आतापर्यंत 13 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. या कार्यक्रमावरून आता काँग्रेसही आक्रमक झाली असून सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खारघरची घटना सरकारने घडवलेली घटना असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
नाना पटोले यांनी सांगितले की, आम्ही पहिल्या दिवसांपासून गी मागणी करतोय असंही त्यांनी यावेळी सांगिले.
नाना पटोले यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वेळ दिलेली होती, मात्र त्यावेळी हा कार्यक्रम घेतला असंही सरकारकडून सांगण्यात येते मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर आरोप करणं म्हणजे लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे असा घणाघातही नाना पटोले यांनी त्यांच्यावर केला आहे.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी टीका करताना त्यांनी सांगितले की, मला मिळालेल्या रिपोर्टनुसार तो कार्यक्रम साडेदहा वाजता सुरू होणार होता.
मात्र अमित शाह एक तास उशिराव कार्यक्रमामध्ये पोहोचले, त्यानंतर 12 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामुळे लोकांना या कार्यक्रमात उष्माघाताचा त्रास झाल्याची टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचे नियोजनच मुळात कडकडत्या उन्हात करण्यात आले. मात्र जी लोकं कार्यक्रमासाठी आली होती, त्यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती.
त्याचदरम्यान उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाला होता तरी देखील हा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला.
हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रस्थळी जमिनीवर काहीही नव्हतं, मंडप नव्हता मात्र एयर कंडिशन मंच राज्याच्या सरकारसाठी तयार केलेला होता.
त्यामुळे झालेल्या मृत्यूची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची आहे कारण हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे याची सर्व जबाबदारी घेऊन सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी नाना पटोले यांनी सांगितले की, मी विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे पत्र मेल करणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.