माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील फलटणमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराची वेळ संपणार होती. 5 वाजून 59 मिनिटांपर्यंत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं कौतुक केलं. तर विरोधकांवर हल्लाबोल केला. फलटणमध्ये मला का बोलावलं? कारण फलटण तुमच्यासोबत आहे. मला अतिशय आनंद झाला असता जर याठिकाणी रामराजे व्यासपीठावर असते तर… जनतेच्या विरोधात जर निर्णय घेतला तर जनता लक्षात ठेवत नाही. शरद पवारांनी मावळत्या सुर्याकडे पाहून शपथ घेतली होती. या ठिकाणचे सिंचनाचे प्रशन मिटविणं त्याचं काय झालं?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गेले अनेक दिवसापासुन रणजित निंबाळकर यांना रोखण्याचे काम काम सुरु आहे. देश परदेशाचे नेते येवुन खासदारांचे कोणी वाकडं करु शकत नाही. 90 टक्के मतदान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ठिकाणाहून व्हायला हवं. मोदी सरकार येण्याआधी सातारा जिल्ह्यातील दुष्काळ दूर होईल, असं वाटलं नव्हतं. पण मागील अडीच वर्षाचे सरकार आले. तेव्हा केंद्र अर्धे पैसे द्यायला तयार झाले. यासाठी आधीच्या राज्य सरकारने उरलेल्या निधीबाबत कवडी मिळणार नाही अस सांगितलं होतं. ज्या व्यक्तिला माढाच्या लोकांनी निवडून दिलं. त्यांना पंतप्रधान बडे मुछे वाला रणजित म्हणतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्येही सभा झाली. इथेही फडणवीसांनी संबोधित केलं. बाज की असली उडाण अभी बाक इरादो क्या है अभी तो माफी है जमीन नापी है हमने अभी पुरा आसमान बाकी है… बंद पडलेले कारखाने त्यांनी चालावला घेतलेलं आहे. 10 लाख पेक्षा जास्त क्रशिंग केलेलं आहे. 40 टक्क्यांनी गाळप वाढवला तो अभिजीत पाटील आहे. आम्ही अभिजीत पाटलांना खिंडीत गाठलं आमच्या येण्याची गळ घातली असं काहीही नाही. जो सतत लढतो त्याला खिंडींत पकडणं नसतं. 2021 ची हे प्रकरण आहे त्यावेळच्या सरकारनं तुम्हाला मदत झाली नाही. निवडणुकीच्या काळात हा स्टे हटला अडचण दूर झाली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
खरं सांगायचं तर अभिजीत पाटलांवर आमचा डोळा होताच. शहाजीबापू पाटील म्हणाले आपला भाचा आहे त्याला मदत करावी लागेल. 2 हजार कोटी रूपये देवून साखर कारखाने विठ्ठल परिवारात मी जबरदस्ती दत्तक म्हणून येतोय. या कारखान्याला संपूर्ण अडचणीत बाहेर काढण्याचा शब्द मी देतो. यासाठी वेगळं ऑपरेशन करावं लागेल. हे ऑपरेशन कसं करायचं मलाही माहिती आहे. पिठाची गिरणी नाही असं सांगतात आणि साखर कारखानदारांना फिरवतात. मी तुम्हाला पुढच्या तीन ते चार महिन्यात एक पुनर्वसनाचा प्लॅन आपण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभेत म्हटलं.