सांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर (Shobhatai Anil Babar) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या पुणे येथे उपचार घेत होत्या. परंतु, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने खानापूर आटपाडी मतदारसंघासह (Khanapur Atpadi) जिल्हावर शोककळा पसरली आहे. बाबर कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर आहेत. अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई अनिल बाबर (वय 62) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर आजारी असल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी दीनानाथ रुग्णालयात अनिल बाबर यांची भेट घेतली होती. यावेळी शिंदे यांनी बाबर यांच्याकडे त्यांच्या पत्नीच्या तब्यतेची विचारपूस केली होती. शोभाताई यांच्यावरील अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता मायणी रोडवरील पवई टेक विटा येथे जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
शोभाताई बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होता. सुरुवातीला त्यांनी विटा येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथं त्यांची प्रकृती स्थित होती. पण, प्रकृतीत चढ-उतार होत होता. मुलगा अमोल आणि सुहास तसेच आमदार अनिल बाबर स्वतः पत्नीच्या उपचारावर लक्ष ठेवून होते. कालच मुख्यमंत्र्यांनी बाबर यांची भेट घेतली होती. सुहास बाबर हे जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती आहेत. तर दुसरा मुलगा अमोल हे माजी नगरसेवक आहेत.