हल्ल्यामागे भाजपचा किंवा फडणवीसांचा हात असल्यास मी खासदारकीचा राजीनामा देईन : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

| Updated on: Apr 12, 2022 | 5:52 PM

सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील घरावर एसटी कामगारांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने चप्पलही भिरकावली होती. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर प्रमुख नेत्यांनी निषेध नोंदवला तर काहींनी हल्ल्याचं समर्थन ही केलं आहे. या हल्ल्याला आज तीन एक दिवस झाले असून पोलिसांकडून याप्रकरणी तपास कुरू असून अॅड. […]

हल्ल्यामागे भाजपचा किंवा फडणवीसांचा हात असल्यास मी खासदारकीचा राजीनामा देईन : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
शरद पवार आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील घरावर एसटी कामगारांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने चप्पलही भिरकावली होती. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर प्रमुख नेत्यांनी निषेध नोंदवला तर काहींनी हल्ल्याचं समर्थन ही केलं आहे. या हल्ल्याला आज तीन एक दिवस झाले असून पोलिसांकडून याप्रकरणी तपास कुरू असून अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर न्यायालयाने (court) सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता माढ्याचे भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. तसेच त्यांनी त्या हल्याचा निषेध व्यक्त करताना सुप्रिया सुळे यांचीही स्तुती केली आहे.

बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवास स्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. तेंव्हा त्या कर्मचाऱ्यांकडून बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. त्यावर बोलताना, माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निषेध व्यक्त केला. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची स्तुती करताना त्यांनी दाखवलेल्या धीराचे कौतुक केले आहे. तसेच जर त्यावेळी सुप्रिया सुळे या पुढे नसत्या आल्या तर नक्कीच दुर्घटना घडली असती, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर निंबाळकर यांनी, पवार साहेबांच्या आम्ही राजकीय विरोधात असलो तरी महाराष्ट्राचं ते एक मोठ नेतृत्व आहेत. महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांचा आदर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

खासदाकीचा राजीनामा देऊ

या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याच्या आरोपावर त्यांना विचारले असता, त्यांनी यावर आपली भुमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी यावर बोलताना, या हल्ल्यामागे जर भाजपचा किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आपण आपल्या खासदाकीचा राजीनामा देऊ असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आपला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास असल्याचेही नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

Chitra Wagh : ‘तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे’, चित्रा वाघांचा मेहबुब शेख यांना इशारा

Video : बोलवाल तिथं चौकशीसाठी यायची माझी तयारी, माझा आवाज तुम्ही बंद करु शकत नाही- चित्रा वाघ

Load Shedding : राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार , कुठे किती कोळसा उरला?