Traval Bus Accident : कराडमध्ये कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल पलटली ; जीवित हानी नाही, आठ जखमी

| Updated on: Jun 06, 2022 | 2:38 PM

या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 22 प्रवाशी होते यामधील 8 प्रवासी अपघातात जखमी झाली आहे. अपघाताच्या घडातनंतर प्रवाश्याना तात्काळ स्थानिक रुग्णायात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमी प्रवाशी हे कोल्हापूर चिपळूण मुंबई या परिसरातील आहेत. त्यांना हायवे ॲम्ब्युलन्स मधून कराड येथे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Traval Bus Accident : कराडमध्ये कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल पलटली ; जीवित हानी नाही, आठ जखमी
पुणे सातारा महामार्गावर विचित्र अपघात
Image Credit source: tv9
Follow us on

कराड- मुंबईवरून 22 प्रवाशी घेऊन कोल्हापूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (Traval Bus)कराड नजीक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात (Accident)आठ प्रवासीजखमी झाले आहेत. हा अपघात कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत घडला. या बसमध्ये बावीस पॅसेंजर होते. यामधील आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर कराडच्या रुग्णालयात (karad Hospital)उपचार सुरू आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे पाच ते सहा च्या दरम्यान मुंबईवरून पॅसेंजर भरून कोल्हापूरला जात होती. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अपघात कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत घडला या बसमध्ये बावीस पॅसेंजर होते यामधील आठ जण जखमी झाले आहेत..

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स मुंबईवरून पॅसेंजर भरून कोल्हापूरकडे निघाली होती. याच दरम्यान कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रॅव्हल्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अचानक ताबा सुटल्याने ट्रॅव्हलस डीवाईडरला धडकली व पलटी झाली. एवढंच नव्हे तर पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत गेली. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 22 प्रवाशी होते यामधील 8 प्रवासी अपघातात जखमी झाली आहे. अपघाताच्या घडातनंतर प्रवाश्याना तात्काळ स्थानिक रुग्णायात दाखल करण्यात आले. अपघातातील जखमी प्रवाशी हे कोल्हापूर चिपळूण मुंबई या परिसरातील आहेत. त्यांना हायवे ॲम्ब्युलन्स मधून कराड येथे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला असल्याची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा महेश होवाळ व पथक तसेच शहर पोलिस स्टेशनचे खालीक ईनामदार महामार्ग पोलीस ठाण्याचे लोखंडे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली तसेच महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा