सातारा : लेदरची पाकीट, चप्पल आशा विविध वस्तू एकाच ठिकाणी मिळणाऱ्या एका मॉलमध्ये एक ग्राहक आपल्या पिस्तुलसाठी कव्हर खरेदीसाठी आले होते. यावेळी आपल्या पिस्तुलसाठी कव्हर खरेदी करताना चुकीच्या पद्धतीने पिस्तुल हाताळल्यामुळे त्या पिस्तुलमधून गोळी सुटून दुकानातील सेल्समनच्या कंबरेला गोळी लागली आहे. पिस्तुलची गोळी कंबरेला लागल्यामुळे सेल्समन जखमी झाला असून ज्याच्या हातून ही चूक झाली आहे. त्या व्यक्तीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असली पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
साताऱ्यामधील शेंद्रे येथे प्रियांका शू मार्ट हा मॉल आहे. या मॉलमध्ये पिस्तुलाच्या कव्हर खरेदी करण्यासाठी एक ग्राहक आला होत.
मॉलमध्ये आल्यानंतर पिस्तुलसाठी कव्हर खरेदी करताना वेगवेगळ्या कव्हर पाहण्यात येत होते. त्यावेळी त्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने पिस्तुल हाताळली. त्यामुळे पिस्तुलचा चाफ ओढला जाऊन त्यातून गोळी सुटून मॉलमधील सेल्समन जखमी झाला आहे.
या दुर्घटनेत अल्किद युसूफ खान हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मॉलमध्ये पिस्तूलसाठी लेदर पाकीट खरेदी करत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगिणतले.
त्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चालू करण्यात आला आहे. जखमी झालेल्या सेल्समनची प्रकृती व्यवस्थित असून पोलीस प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरु आहे.
शेंद्रे गावात प्रियांका शू मार्ट हे प्रसिद्ध दुकान आहे. या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या चप्पल, लेदरची पाकिटे अशा वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गा लगत हा मॉल असल्यामुळे कोल्हापूरहून पुण्याला जाणारे पुण्याहून कोल्हापूरला जाणारे ग्राहक या ठिकाणी आवर्जून थांबून खरेदी करत असतात.