संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये (Satara News) काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारमधून जात असताना वडील आणि मुलीनं केलेलं प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास (Father Daughter drown with car in Flood) ठरला. पुराच्या पाण्यात एक अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) कार बुडाली. या कारमध्ये वडील आणि मुलगी जे अडकले, ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जाते आहे.
साताऱ्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरुन वाहून लागले होते. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु झाला होता. अशात एका मार्गावरुन जात असताना मुलगी आणि वडिलांवर काळानं घाला घातला.
साताऱ्यातील सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान ही दुर्घटना घडली. एक मारुती अर्टिगा कारमधून लेकीसह वडील निघाले होते. छगन मदने आणि प्रांजल मदने अशी कारमधील दोघांची नावं होती. सोमंथळीजवळ मात्र एक विचित्र घडना घडली.
मदने यांची अर्टिगा कार पुराच्या पाण्यात अडकली. पुराच्या पाण्यातील बाहेर पडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण तो अपयशी ठरला. बघता बघता संपूर्ण कारमध्ये पाणी शिरलं. पुराच्या पाण्याने अर्टिका कारला गिळंकृत केलं. यामुळे कारच्या आतमध्ये असलेल्यांना बाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळू शकली नाही. कारच्या आतमध्येच वडील आणि मुलगी अडकले गेले.
#Video : साताऱ्यात बापलेकीला कारमध्येच जलसमाधी, पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, दोघांचाही दुर्दैवी अंत #Satara #ACCIDENT pic.twitter.com/UOmgOYbw0d
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 18, 2022
संपूर्ण कार पाण्यात गेल्यामुळे छगन आणि प्रांजल यांच्या नाकातोंडात पाणी गेलं. पाण्यात गुदमरल्याने त्यांना श्वास घेण्यात अडचणी आल्या. या दुर्दैवी घटनेत छगन आणि प्रांजल या बापलेकीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. त्यांच्या मृत्यूमुळे मदने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
अनेकदा पुराच्या पाणी दुचाकी घेऊन जाणं हे अनेकांना अंगलट आल्याचं पाहायला मिळालंय. पाण्याच्या प्रवाहात गाड्या वाहून जाण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता तर चक्क पुराच्या पाण्यात संपूर्ण कारसह कारमधील दोघा जणांवरही काळानं घाला घातल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.