सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते. आणि हे सरकार कधीही पडू शकतं का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना सत्ता तर भाजपचीच येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून हे सरकार काही दिवसात कोसळणार असल्याची टीका केली जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनीही काल सांगितले की, येत्या काही दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आमदार जयंत पाटील यांच्या या टीकेनंतर भाजपचे आमदारही अॅक्टिव्ह झाले आहेत. विरोधकांकडून दुसरा काही विषयच नसल्याने त्यांनी सरकारविषयी असे मत व्यक्त केले जाते असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
हे सरकार कोसळणार आणि 16 आमदारांचे निलंबन होणार या त्यांच्या वक्तव्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांनी आगामी काळात सत्ता तर भाजपचीच येणार असल्याचा विश्वासही जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर टीका करताना त्यांनी भाजपविषयीही विश्वास व्यक्त केला.यावेळी ते म्हणाले की, विरोधक हे कोणत्या ना कोणत्या तरी आशेवर जगणारे आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने हे सरकार कोसळणार आणि 16 आमदारांचं निलंबन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र हे सरकार पूर्ण कार्यकाळ टिकणार असल्याचा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले की, माझ्यासह भाजपचे कराड दक्षिणचे नेते अतुल भोसले, कराड उत्तरचे भाजपचे नेते धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे हे 2024 च्या निवडणुकीत आमदार होणार असल्याचेही सूचक वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.