सातारा : काही दिवसापूर्वी राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तर ऐन रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने शेतमालाला बाजारात योग्य बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे उभा पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला होता. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानीची मागणी केली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनेही अवकाळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता त्याविषयी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सवलत द्यायची आहे त्याचा निर्णयदेखील घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अधिवेशन काळामध्ये सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांकडून यशस्वी प्रयत्न करण्यात आला. तर एका वेळी लक्षवेधी 22 सूचना लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे विरोधक पूर्णपणे हतबल झालेलेही पाहायला मिळाले असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मागील अडीच वर्षात केंद्राचा निधी पडून होता. त्यामुळे अनेक प्रस्ताव त्या काळात गेलेच नाहीत. दिल्लीला पाठपुरावा न केल्यामुळे मागील अडीच वर्षात केंद्राकडून निधी कमी आला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारने ज्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये केल्या आहेत. त्याची तरतूदही आम्ही पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये लवकरच देऊ असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र सरकारकडून याबाबत अजून कोणतीही तारीख अजून देण्यात आले नाही, त्याबाबत याद्या बनवण्याचे काम सुरू असल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
विधानसभेमध्ये विरोधकांच्या विरोधामध्ये तीव्रता दिसून आली नाही. यावेळी मुद्देसूद विरोध दिसून आला नाही अरविंद सावंत यांना हे सर्व सांगायला तीन वर्षे का लागली.
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव घेण्यात आलं होतं याविषयी आम्हा सर्व आमदारांना आधी कल्पना का दिली नाही. तीन वर्षानंतर यामध्ये किती सत्य आहे हे ओळखून जावे
महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंना देणे हा त्यांचा प्रश्न आहे.मात्र शिवसेना आणि भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत.
कालच्या झालेल्या सभेवरूनही शंभूराज देसाई यांनी टोला लगावला आहे. नाना पटोले हे कालच्या सभेदरम्यान एका दिवसासाठी आजारी पडतात आणि आज गुजरात दौऱ्याला जातात. त्यामुळे असे कसे असा प्रश्नही निर्माण होण्यासारखा आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत या निवडणुका स्थानिक लेवलला घेतल्या जातात. यामध्ये चिन्हाचा समावेश नसतो. मात्र स्थानिक पातळीवर फायद्याचा सोयीचे असेल अशा सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी कोरोनाविषयी बोलताना सांगितले की, कोरोनाबाबत ज्या ठिकाणी पेशंट वाढत आहेत. त्या ठिकाणी कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचनादेखील प्रशासनाला देण्यात आले आहेत.जर कोरोनाचे पेशंट वाढू लागले आहेत तर इन्फ्रास्ट्रक्चर तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मागील काही दिवसांपूर्वी आम्ही सर्व आमदार मंत्री अयोध्येला जाणार होतो मात्र आम्ही आता अधिवेशन संपल्यामुळे अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहोत आणि धनुष्यबाणाचे पूजनही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराविषयीही बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकरच होणार असल्याचे विश्वासाने त्यांनी बोलून दाखवले.
छत्रपती संभाजीनगरमधील राडा झाल्यानंतर त्यावरून राजकीय टीका टिप्पणी करण्यात आली. जातीय दंगलीवरून भाजप आणि शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.
त्यावरून जातीय दंगली महाविकास आघाडी सरकारच्या काळातही झाल्या आहेत. दंगली घडवणाऱ्यातील काही संशयित पकडले असून लवकरच याची वस्तुस्थिती समोर येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.