सातारा : अफजल खानाच्या (Afzal Khan) कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यात सुरुवात करण्यात आलं आहे. प्रतापगडाच्या (Pratapgad, Satara) पायथ्याजवळ अफजल खानाची कबर आहे. गुरुवारी सकाळीच स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास (Action Against illegal construction) सुरूवात करण्यात आलीय. अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनधिकृत बांधकाम पाडताना माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून 6 ते 7 किलोमीटर दूर हटवण्यात आलंय. अफझान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टानं दिले होते आदेश. कोर्टाच्या आदेशाची आता प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आलीय.
अफझल खान यांची प्रतापगडावरील कबर पाडण्यात यावी अशी मागणी काही संघटनांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रतापगडावरील कबरीच्या ठिकाणी केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं असे आदेश देण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून अफझल खान यांच्या कबरीजवळ अनधिकृत बांधकाम पाडलं जात असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. अफझल खान हा स्वराज्याचा शत्रू होता. अफझला खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हा वध शिवरायाचं शौर्य दाखवतं.
कबर उद्ध्वस्त करण्याची काही लोकं मागणी करत आहेत. पण कबर उद्ध्वस्त केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते, असंही अमोल मिटकरी यांनी यावेळी म्हटलं.
अफझल खानाच्या कबरीच्या लगत असलेल्या खोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या खोल्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या होत्या. या खोल्यांवर आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. हा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो.
अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांनीही या कारवाईवेळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माध्यमांनाही कबरीच्या पाडकामाच्या जवळ जाण्यास मज्जाव करण्यास आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास जेसीबी, क्रेनच्या मदतीने हे पाडकाम करण्यास सुरुवात करण्यात आलीय.