सरकार बिलकुल…; शंभूराज देसाई यांचं मनोज जरांगेंना आवाहन काय?

| Updated on: Jul 20, 2024 | 6:41 PM

Shambhuraj Desai on Majon Jarange Patil : मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी साताऱ्यात बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. तसंच हैदराबाद गॅझेटबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

सरकार बिलकुल...; शंभूराज देसाई यांचं मनोज जरांगेंना आवाहन काय?
शंभूराज देसाई, मनोज जरांगे पाटील
Image Credit source: Facebook
Follow us on

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आम्ही बातचित केली. साताऱ्यात टीव्ही 9 मराठीशी बोलताना शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर भाष्य केलं. आंदोलन दरम्यान जे गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्यामध्ये दोन लाखाच्या वर असणारे गुन्हे मागे घेता येत नाहीत. त्याबाबत ही कार्यवाही सुरू आहे. अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे हे राहून गेलं आहे. तरीपण आम्ही कार्यरत आहोत सरकार आपल्या मागण्यांच्या पासून बिलकुल मागे गेलेले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी. सरकार बिलकुल चाल ढकल करत नाही. म्हणून जरांगे पाटील यांनी कोणताही आंदोलनाचा मार्ग निवडू नये. आरक्षणाचा लाभ घेताना कोणत्याही एका प्रवर्गातून मिळतो. जे आपण धोरण ठेवले आहे त्या धोरणाच्या बाहेर सरकार जाणार नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले?

मागील वेळी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना संदीप पान भुमरे आणि मी गेलो होतो याविषयी सविस्तर चर्चा झाली होती. या भेटीनंतर मी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांसोबत बैठक केली होती. यामध्ये ड्राफ्ट नोटिफिकेशन तयार केले होते. त्यामध्ये दोन्ही बाजूच्या हरकती मागवल्या होत्या. याचा सारांश काय होता याचे आजही काम सुरू आहे, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

हैदराबाद गॅझेट तात्काळ लागू करा. मात्र हैदराबाद सरकारच्या ताब्यात जी कागदपत्र आहेत. त्याची सर्टिफाय कॉपी आणायची आहे. सर्टिफाय न करता जर डॉक्युमेंट आणले आणि त्याची ऑथेंटीकेशन टिकले नाही. पुन्हा समस्या होऊ शकते. आपले 11 अधिकाऱ्यांची टीम या हैदराबाद या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी साडे आठ हजारहून अधिक डॉक्युमेंट त्या ठिकाणी आहे. अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, असंही देसाई म्हणाले.

मनोज जरांगेंना आवाहन काय?

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत आठ लाखाचं ज्या पालकांचे उत्पन्न आहे. त्यांना मोफत शिक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये साडेतीनशेहून अधिक कोर्सेस आहेत यामध्ये पावणे दोन हजार कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना काही स्पष्टता हवी असेल तर त्या जीआर नुसार करून दिली जाईल. लाडका भाऊ लाडकी बहीण या योजनांबाबत जरांगे पाटील यांनी टीका करू नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढा उभा करता आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. सरकार एवढं अनेक योजनांमधून चांगलं निर्णय घेतंय. या सर्व योजनांची वित्तीय तरतूद ज्या वेळेस अर्थसंकल्पावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्या आहेत, असं शंभुराज देसाई म्हणाले.