…तर या देशात अजूनही राजेशाही असती, उदयनराजे भोसले असं का म्हणालेत

| Updated on: Dec 15, 2022 | 4:56 PM

त्याशिवाय या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही नांदणार नाही, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.

...तर या देशात अजूनही राजेशाही असती, उदयनराजे भोसले असं का म्हणालेत
उदयनराजे भोसले
Follow us on

सातारा : येथील एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जीवन हेक्टिक झालंय. कामाच्या व्यापामुळं व्यस्त झालंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा विसर पडताना आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. त्यांचा विचार अस्तित्वात राहिलाय का, असा प्रश्न उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केला जातोय. कारण नसताना भेदभाव केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करतो. तेव्हा पंजाब राहिला नाही. सिंध राहिला नाही. बंगाल एकीकडं गेलं. अफगाणिस्तान दुसरीकडं गेलं. मग, शिल्लक राहिलं तरी काय. त्यावेळी जे-जे राज्यकर्ते होते. त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बघीतला, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.

राजेशाहीनंतर लोकशाही अस्तित्वात आली. लोकशाहीतल्या राजांनी केलं तरी काय. इस्लामिक देश पाहिले, तर तिथं अजूनही राजेशाही आहे. शिवाजी महाराज यांनी वाटलं असतं की, आपण राजेशाही अस्तित्वात ठेवावी तर अजूनही या देशात राजेशाही असती, असा विचार उदयनराजे यांनी व्यक्त केला.

शिवाजी महाराज यांना वाटलं की, राज्यकारभारात लोकांचा सहभाग असला पाहिजे. त्यामुळं त्यांनी लोकांची संकल्पना मांडली. लोकशाही अस्तित्वात आली. त्यानंतर घराणेशाही अस्तित्वात आली. ठरावीक घराण्याचेच लोकं राज्य करू शकतात.

त्याच त्याच घराण्यातील लोकं राज्यकर्ते बनले. तेच राज्य चांगल्या पद्धतीनं करू शकतात, असा विचार रुजविला गेला, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. महात्मा गांधी यांनी विकेंद्रीकरणाची संकल्पना रुजविली. सामान्यांच्या हातात सत्तास्थान दिलं गेलं पाहिजे. त्याशिवाय या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही नांदणार नाही, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.