कराडः राज्यातील परिवहन महामंडळाच्या चालक वाहकांचे आंदोलन (driver conductors agitation) चिघळल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर एसटी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यावेळी सिल्व्हर ओकवरील (Silver Oak Bungalow) एसटी आंदोलनात सहभाग घेतलेल्या अटक झालेल्या महिला वाहकाचे निधन झाले आहे. त्यामुळे एसटी कामगारांसह कराड तालुक्यातून त्यांच्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. कराड आगारातील ज्या महिला वाहक यांचे निधन झाले आहे त्यांचे नाव सुषमा नारकर (Sushma Narkar Death) असून त्यांच गाव कराड तालुक्यातील येवती आहे.
सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर त्या आठ दिवस तुरुंगातच होत्या. काही दिवसानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यांची जामिनावर सुटका झाल्यापासून त्या आजारी होत्या. त्या आजारपणातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे त्यांच्या राहत्या घरीच निधन झाले.
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याचा मान सुषमा नारकर यांना मिळाला होता.
सुषमा नारकर 2000 मध्ये त्या कराड एसटी आगारात वाहक म्हणून दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे 22 वर्षे त्यांनी वाहक म्हणून एसटीमध्ये सेवा दिली होती. गतवर्षी परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. त्यामध्ये सुषमा नारकर यांनीही सहभाग घेतला होता.
एसटी आंदोलनातील सुषमा नारकर यांच्याआधी काही कर्मचाऱ्यांचेही निधन झाले आहे. सुषमा नारकर यांनी या आंदोलनात पहिल्यापासून सहभाग नोंदविला होता. सिल्व्हर ओकवर कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यावेळी त्या मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सिल्व्हर ओकवर कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत हल्ला केला त्यावेळी त्यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्यांनंतर काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला होता, मात्र जामीन मिळाल्यानंतर त्या घरी आल्यापासून आजारीच होत्या. काही दिवस त्यांच्या उपचार करण्यात आले होते, मात्र त्या आजारपणातच त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनामुळे परिसरातून आणि कर्मचारीवर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.