सातारा : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता अजित पवार 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असल्याच्याही बातम्या येत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे अजित पवार यांचा भाजप प्रवेशावरून राजकारण चालू आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी आपण कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीतच असल्याचेही घोषित केल्याने याविषयी आणखी दोरदार चर्चा चालू झाली आहे. या सगळ्या राजकारणावरूनच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
सध्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवरही टीका केली आहे. राज्याच्या अनेक भागात अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नसून त्यांच्या त्यांच्या राजकारणात राजकीय नेते मश्गूल असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत, त्याकडेही सरकारचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विषयावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात आहे तर दुसरीकडे अजित पवार, एकनाथ शिंदे, आणि ठाकरे गटातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.
अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने खासदार राजू शेट्टी यांनी त्यावरून म्हणाले की, राज्याच्या राजकारणात सुरू असलेला हा सर्व प्रकार म्हणजे हा खेळ सावल्यांचा असल्यासारखी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी केली आहे.
जनतेचे लक्ष दुसरीकडे वेळविणयासाठी हे नाटक सुरू आहे असा जोरदार घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर विरोधी पक्ष विरोधी पक्षासारखा वागत नसल्याची टीकाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेतकरी कष्टकरी सामान्य लोकांच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविणयासाठी हे नाटक सुरू असून जनतेच्या भावनांशी खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी जनतेकडे लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी कराड येथे अपंग संस्थेच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.