दिनकर थोरात, प्रतिनिधी, कराड (सातारा) : कराड चिपळूण रोडवर विहे गावावरून क्रूझर जात होती. संध्याकाळची वेळ असल्याने समोरचे व्यवस्थित दिसले नाही. त्यामुळे क्रूझर गाडी रस्त्याच्या शेजारी असलेल्या ५० फूट खोल विहिरीत कोसळली. या क्रूझरमध्ये किती लोकं होते. हे वृत्त लिहिस्तोवर कळलं नव्हतं. पण, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
कराड चिपळूण रोडवर विहे गावच्या हद्दीत ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत क्रूजर गाडी कोसळली. गाडी पोलिसांनी बाहेर काढली. मात्र गाडीच्या काचा फुटल्या आहेत. या क्रूझरमध्ये किती लोक होते. याची माहिती घेण्याचे काम पोलीस करत होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांसह प्रशासनाकडून विहिरीत शोध सुरू होता.
पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीत कराड चिपळूण रस्त्याच्या कडेला विहीर आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास क्रूझर चालक मल्हारपेठहून कराडच्या दिशेने येत होता. सायंकाळी सात वाजवण्याच्या सुमारास विहे गावच्या हद्दीत आले. त्यानंतर चालकाचा क्रूझरवरील ताबा सुटला.
विहीर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत सुमारे 50 ते 60 फूट खोल पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीतून क्रुझर गाडी काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गाडीमध्ये किती लोक होते. याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.
या घटनेनंतर रस्ते वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकचा चर्चेत आला. वाहतुकीचे रस्ते चकाचक झालेत. त्यामुळे वाहनचालक गाडीचा वेग वाढवतात. अशावेळी अपघाताची शक्यता जास्त असते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.