गोळीबाराने गाव हादरला…; नंतर पाहतात ते सगळचं होतं धक्कादायक…

| Updated on: Mar 19, 2023 | 11:42 PM

या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या व्यक्तीचीही तब्बेत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गोळीबाराने गाव हादरला...; नंतर पाहतात ते सगळचं होतं धक्कादायक...
Follow us on

कराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील मोरणा गावात आज गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार झाल्याने 2 जण ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मोरणा गावात गोळीबार होताच पोलिसांनी धाव घेऊन तपास चालू केला आहे. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार चालू करण्यात आले.

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात केलेल्या गोळीबारात दोघे जण ठार झाले असून एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.  ही घटना पवनचक्कीच्या जुन्या व्यवहारातून झाल्याची चर्चा आहे.

या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाले असून मदन कदम हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे गोळीबारात ठार झालेला एक जण उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांचा कार्यकर्ता असल्याचा समजते

मोरणा भागात गोळीबार झाल्याचे आणखी काही कारण आहे का, त्याचे तपास पोलीस करत आहेत.  गोळीबार केल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला असून हा पवनचक्कीच्या वादातून ही घटना घडली आहे का असा सवाल करण्यात येत आहे.

पाटण तालुक्यातील मोरणा भागात फायरिंग झाल्यानंतर या घटनेत दोघेजण जागीच गतप्राण झाले.तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला कराडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना घडताच घटनास्थळी पाटण पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित म्हणून मदन कदम यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोरणा परिसरात ही घटना घडली असली तरी गोळाबार का करण्यात आला त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर हा प्रकार जमिनीच्या वादातून घडला आहे का त्याचीही चौकशी सुरू असून मदन कदम याच्याकडून माहिती काढून घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

तर या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला कराडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या व्यक्तीचीही तब्बेत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.