उदयनराजे भोसले म्हणतात, मीडियाला मला मोठं दाखवायचं नाही, पण, …म्हणून मला टीआरपी

| Updated on: Oct 08, 2022 | 7:02 PM

टीआरपी कशामुळं आहे. तर मी लोकांचे प्रश्न घेऊन मीडियासमोर जातो.

उदयनराजे भोसले म्हणतात, मीडियाला मला मोठं दाखवायचं नाही, पण, ...म्हणून मला टीआरपी
उदयनराजे भोसले
Image Credit source: tv 9
Follow us on

संतोष नलावडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे कृषी प्रदर्शनाच्या (Agricultural Exhibition) उद्घाटनीय कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताच्या गोष्टी केल्या. भोसले म्हणाले, मी तळमळीनं का बोललो कारण शेतकऱ्यांपर्यंत पोहचलं पाहिजे. मीडियाला (Media) मला काय फार मोठं आहे असं दाखवायचं नाही. कोणीचं बोललं नाही म्हणून बोललो.

उदयनराजे भोसले म्हणाले, मला खूप मोठं असल्याचं दाखवायचं नाही. कुणीचं बोललं नाही. म्हणून बोललो. टीआरपी कशामुळं आहे. तर मी लोकांचे प्रश्न घेऊन मीडियासमोर जातो. लोकं म्हणतात, कॉलर का ओढतो. करेक्ट आहे म्हणून. लोकांचे प्रश्न मनापासून मांडतो. हे भाषण नाही मनापासूनचं बोलणं आहे. भाषण खूप बघितलेत.

सात, आठ, नऊ, दहा, अकरा असं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. आज उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी उदयराजे भोसले बोलत होते.

हा देश सगळ्यात मोठी लोकशाही आहे. जातीधर्माचे लोकं या देशात राहतात. या देशाचे तुकडे व्हायला एवढासुद्धा काळ लागणार नाही.

आज खुर्ची घेऊन बसतो. उद्या वाडगं घेऊन बसायला लागेल. खाली बसलो की अधोगतीच्या मागे प्रगतीचा मार्ग तुम्हाला माहीत आहे. कशाला एवढं करायचं, असंही ते म्हणाले.

माझा स्वार्थ हाय. नक्कीच स्वार्थ आहे. तुमच्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे. उंचीवरती पोहचलं पाहिजे, असंही उदयराजे भोसले यांनी सांगितलं.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये लोकांसमोर आपले मत मांडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी लढतो. त्यामुळं माध्यम मला चांगला टीआरपी देतात, असं ते म्हणाले.