रत्नागिरी : भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर कार नेणं महागात पडू शकतं, याविषयी वारंवार बजावूनही अनेक पर्यटकांचा अतिउत्साहीपणा नडताना दिसतो. रत्नागिरीतही चारचाकी गाडी समुद्रकिनाऱ्यावर नेणं पर्यटकांच्या अंगलट आलं. स्कॉर्पिओ कार समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रुतून बसल्याने पर्यटकांची अडचण झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Scorpio Car Stuck at Ratnagiri Bhatye Sea Shore)
रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारी घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. पर्यटकांची स्कॉर्पिओ बुधवारी सकाळी भाट्ये समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रुतली. गाडी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. भरतीच्या पाण्यामुळे गाडी बाहेर काढण्यात मोठे अडथळे येत होते.
पाहा व्हिडीओ :
उत्तन समुद्र किनाऱ्यावरील घटनेच्या आठवणी
मुंबईजवळील भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावरही एक गाडी समुद्रात बुडाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. तरुणांच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडल्याचे समजते. हे तरुण स्कॉर्पिओ गाडीने उत्तन समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. समुद्रकिनारी आल्यानंतर तरुणांनी बिनाधास्त गाडी तिथेच पार्क केली आणि ते निघून गेले होते.
थोड्या वेळानंतर समुद्राला भरती आल्यामुळे गाडी समुद्राच्या पाण्यात बुडायला सुरुवात झाली. ही गोष्ट तेथील लोकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी अग्शिशमन दलाला कळवले. अग्शिशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत ही गाडी समुद्रातून खेचून बाहेर काढली. (Scorpio Car Stuck at Ratnagiri Bhatye Sea Shore)
काही दिवसांपूर्वी वसईतही एक स्विफ्ट कार समुद्रात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला होता. भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्ती गाडी पार्क करुन निघून गेला होता. पहाटे समुद्राला भरती आल्यानंतर ही गाडी आत खेचली गेली. समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटरवर खोल समुद्रात कार अडकली होती. कार पूर्णपणे समुद्रात बुडालेल्या अवस्थेत होती. फक्त तिचा वरचा टप आणि काच दिसत होती. कार समुद्रातील रेतीमध्ये फसल्याने तिला बाहेर काढणे कठीण जात होते. अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साहाय्याने ही कार बाहेर काढली होती.
संबंधित बातम्या :
VIDEO: बीचवर गाडी पार्क करण्याची चूक नडली; भरतीनंतर स्कॉर्पिओ भाईंदरच्या समुद्रात
VIDEO | किनाऱ्यावर कार लावून फेरफटका महागात, भरती आल्यामुळे लाटेसोबत स्विफ्ट समुद्रात
(Scorpio Car Stuck at Ratnagiri Bhatye Sea Shore)