मुंबई : (Lalbag Ganesh Festival) लालबागच्या राजाचे दर्शन घ्यावे अशी प्रत्येकाची मनोमने ईच्छा असते. पण ते शक्य होईलच असे नाही. त्यातल्या त्यामध्ये ऐन गणेश उत्सवामध्ये तर ते कसरतीचे काम आहे. पण बाप्पा विराजमान झाले असताना त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले आहे ते (Self-absorbed students) स्वमग्न विद्यार्थ्यांना आणि विशेष म्हणजे ते ही पालकांसोबत. आयुष्यभर आपल्याच विश्वात गुंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीयच म्हणावा लागेल. कारण लालबागच्या मंडपात एकाच वेळी 100 स्वमग्न ते ही आपल्या पालकांसोबत आले आणि काही मिनिटांसाठी कमालीची शांतता पसरली. आवाज घुमत होता तो, गणरायाच्या जयघोषाचा. हा अनोखा सोहळा घडवून आणला आहे तो चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर संस्थेने. (Mumbai) मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सुमारे १०० स्वमग्न मुलांनी त्यांच्या पालकांसह आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
एकाच वेळी 100 स्वमग्न विद्यार्थी हे त्यांच्या पालकांसमवेत आणि बरोबर शिक्षकही. विद्यार्थी लालबागच्या प्रवेशद्वारात येताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी गणरायाचा जयघोष केला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर त्यांनी माटुंगा येथील जीएसबी गणरायाचेही दर्शन घेतले.
चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही संस्था गेली 12 वर्ष स्वमग्न मुलांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवते. “स्वमग्न मुलांना समाजात मिसळणे अधिक सोपे जावे, तसंच त्यांच्यात सामाजिक संवाद कौशल्य विकसित व्हावीत हा यामागचा हेतू आहे. पण गेली दोन वर्ष करोना महसाथीमुळे हे शक्य झाले नव्हते, असे चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.
लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी माटुंगा येथील जीएसबी गणरायाचेही दर्शन घेतले. दरवर्षीची परंपरा यंदाही कायम ठेवत या ट्रस्टने आज वेगवेगळे कार्यक्रम घेतले होते. या दरम्यान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा काही वेगळाच होता.
“स्वमग्न मुलांच्या वर्तवणुकीच्या काही विशिष्ट समस्या असतात. त्यांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे सहजतेने इतरांमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे पालक त्यांना सामाजिक कार्यक्रमांमध्ये घेऊन जाण्याचे टाळतात. त्यामुळे या मुलांमध्ये आणखी भीती निर्माण होते. उलट मुलांना समाजातील लहान मोठ्या कार्यक्रमांत सहभागी करून घेतात त्यांच्या मुलांचा विकास तुलनेने अधिक वेगाने होतो असे ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी सांगितले आहे.