अनिल देशमुख जेलच्या बाहेर येताच काय घडलं? आर्थररोड कारागृहाबाहेर काय काय घडलं? पाहा

| Updated on: Dec 28, 2022 | 5:34 PM

मोठ्या जल्लोषात अनिल देशमुख यांचे स्वागत देशमुख समर्थक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. यावेळी स्वागत पाहून अनिल देशमुख भारावले होते.

अनिल देशमुख जेलच्या बाहेर येताच काय घडलं? आर्थररोड कारागृहाबाहेर काय काय घडलं? पाहा
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई : शंभर कोटींच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. त्यावरून अनिल देशमुख हे तब्बल चौदा महीने आर्थररोड कारागृहात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जामीन मंजूर झाला होता. मात्र, त्यावर केंद्रीय यंत्रणेने आक्षेप घेतल्यानंतर आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. आर्थर रोड कारागृहात अनिल देशमुख बाहेर पडणार असल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांसह अनिल देशमुख समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. अनिल देशमुख बाहेर येतात त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांना मिठी मारली होती. इतकंच काय तर अनिल देशमुख यांच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हार घातला, सुप्रिया सुळे यांनीही देशमुख यांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्वागत स्कार्प टाकत अभिनंदन केले. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे हे उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अनिल देशमुख यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करत असतांना अनिल देशमुख यांचे कुटुंब देखील उपस्थित होते, मोठ्या प्रमाणात समर्थक उपस्थित होते.

अनिल देशमुख यांच्या मुलीही आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर उपस्थित होत्या, अनिल देशमुख कारागृहाच्या बाहेर येताच देशमुखांच्या गळ्यात गुलाबाच्या फुलांचा हार जयंत पाटील यांनी टाकला होता.

हे सुद्धा वाचा

मोठ्या जल्लोषात अनिल देशमुख यांचे स्वागत देशमुख समर्थक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. यावेळी स्वागत पाहून अनिल देशमुख भारावले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग केलेल्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली होती, सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपवरुन अनिल देशमुख अडचणीत सापडले होते.

पहिल्यांदाच कुणी एखादा लोकप्रतिनिधी कारागृहाच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी दिग्गज नेते उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या उपस्थित असलेल्या नेत्यांना पेढे भरवत, गाडीत बसून स्वागतासाठी जमलेल्या समर्थकांना हात देत आभार मानले आहे.