गुवाहाटी – शिंदे गटाचे आमदार आज गुवाहाटीला विमानानं गेले. त्याठिकाणी गुवाहाटीचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भेट घेतली. तेव्हा बिस्वा यांनी शहारजीबापू पाटील यांना त्यांचा डॉयलॉग म्हणायला लावला. आसामच्या मुख्यमंत्र्यांना शहाजी बापूंची भुरळ पडली. गुवाहाटीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी शहाजी बापूंना तो जुना डायलॅाग बोलायला लावला.
पाच महिन्यांपूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केले. त्यावेळी ते सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटीत असताना त्यांनी गावातील एका कार्यकर्त्याला फोन केला होता. तेव्हा शहाजीबापू यांनी गुवाहाटीत मजा येत असल्याचं सांगितलं.
गुवाहाटीत काय झाडी काय डोंगर काय हवा, असा डायलॉग म्हटला होता. तो डायलॉग खूप प्रसिद्ध झाला. आता पाच महिन्यानंतर गुवाहाटीला पुन्हा शिंदे गटाचे आमदार गेले. यावेळी आसामच्या मुख्यमंत्र्यानी या जुन्या डायलॉगची आठवण करून दिली. यावेळी शहाजी बापू यांनी पुन्हा तो डायलॉग म्हणून दाखविला.
गेल्या वेळी शहाजीबापू गावात आले तेव्हा भाषणांत त्यांनी त्या डायलॉगची आठवण काढून द्यावी लागे. बरेच दिवस बापूंची डायलॉग ही उपचार प्रद्धित अतिशय प्रेरणादायी ठारली.