बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. शेवटच्या दिवसाच्या प्रचारासाठी शरद पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांची बारामतीत मोठी सभा होणार आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या सभेच्या ठिकाणी अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शरद पवार यांचे पावसात भिजतानाचे फोटोही या पोस्टर्सवर लावण्यात आले आहेत. होर्डिंग्सजवर मजकूरही लिहिण्यात आला आहे. बाप तो बाप रहेगा… असं या पोस्टर्स आणि होर्डिंग्जवर लिहिण्यात आलं असून एक प्रकारे अजितदादांना डिवचण्याचं कामच करण्यात आलं आहे.
देशभरात परवा 7 तारखेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा तिसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. या लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या जरी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी लढाई ही बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असणार आहे. आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामतीमधील मिशन हायस्कूलच्या मैदानात पार पडत आहे. या सभेची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचीही सभा आज बारामतीत होणार आहे. या सभेचीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
पवारांच्या सभेत बॅनरबाजीवर अधिक भर देण्यात आला आहे. शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणी बाप तो बाप रहेगा… असा मजकूर लिहून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या सभेत साताऱ्यातील सभेतील शरद पवार यांचे पावसात भिजून भाषण करतानाचा फोटोही लावण्यात आले आहेत.
वाऱ्यासोबत उडून चाललेल्या
पालापाचोळ्याची फिकीर नाही,
इथे नव्या पालवीला जन्म
घालणारा महावृक्ष आहे…
लय भारी भारी लोकांना सरळ
करण्याची माझ्यात ताकद आहे
बाप तो बाप रहेगा
शरद पवार यांचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या
घर फोडणाऱ्या, भाजपला बारामतीकर साथ देणार की लाथ मारणार?
वोह तुफां है, वोह आँधी है
नाम शरद पवार है!